स्पोर्ट्स

India Wrestling Flashback 2025 : वरिष्ठांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव, युवा खेळाडूंकडून मात्र उज्ज्वल भविष्याची आशा

रणजित गायकवाड

India Wrestling Flashback 2025

भारतीय कुस्तीसाठी आव्हानात्मक ठरलेल्या 2025 या वर्षात वरिष्ठ स्तरावर पदकांची संख्या समाधानकारक नसली, तरी कनिष्ठ (ज्युनिअर) स्तरावरील खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे उज्ज्वल भविष्याची आशा कायम राहिली आहे.

अंतिम पंघालचे सातत्य

मॅटवर अंतिम पंघाल ही भारताची सर्वात सातत्यपूर्ण वरिष्ठ खेळाडू म्हणून समोर आली. महिलांच्या 53 किलो वजनी गटात खेळताना या हरियाणाच्या मल्लाने जागतिक अजिंŠयपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावून भारताचे अस्तित्व राखले. अंतिमने कांस्यपदकाच्या लढतीत दाखवलेला दबदबा आणि दडपण हाताळण्याची तिची शैली, यामुळे ती जागतिक स्तरावरील अव्वल खेळाडू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तिने आशियाई अजिंŠयपद स्पर्धेतही तिसरे स्थान पटकावले आणि वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून वर्षाचा समारोप केला.

दुसरीकडे, वरिष्ठ जागतिक अजिंŠयपद स्पर्धेतील भारताची एकूण कामगिरी निराशाजनक राहिली. अंतिमचे कांस्यपदक हे या स्पर्धेतील भारताचे एकमेव पदक ठरले. अनेक मल्लांना सुरुवातीच्या फेरीतच निसटता पराभव पत्करावा लागला. आशियाई स्तरावर मात्र मनीषा भानवाला (62 किलो) हिने सुवर्णपदक जिंकून आपली छाप पाडली.

अमन सेहरावतवरील अनपेक्षित बंदी

गतवर्षी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय ठरलेला अमन सेहरावत (57 किलो) याच्यासाठी हे वर्ष चढ-उतारांचे राहिले. जागतिक अजिंŠयपद स्पर्धेत वजन जास्त भरल्याने त्याला अपात्र ठरवण्यात आले आणि त्याच्यावर बंदी घालण्यात आली. भारतीय कुस्ती महासंघाची बिनशर्त माफी मागितल्यानंतर त्याची बंदी उठवण्यात आली आणि त्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये पुनरागमन केले. याच काळात सुजित कलकलने बचावात्मक कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बजरंग पुनियाचा वारसदार म्हणून 65 किलो गटात त्याने आपली जागा भक्कम केली असून, तो भारताचा भविष्यातील मोठा तारा मानला जात आहे.

नेहा आणि रितिकावर बंदीची कुऱ्हाड

युथ (यू-20) जागतिक स्पर्धेत वजन जास्त भरल्याने नेहा सांगवानलाही बंदीचा सामना करावा लागला. तसेच, भारताची प्रतिभावान मल्ल रितिका हुडा (76 किलो) हिच्यावर उत्तेजक द्रव्य सेवन (डोपिंग) प्रकरणी बंदी घालण्यात आली. यामुळे जड वजनी गटात भारताच्या पदकाच्या संधीला मोठा फटका बसला.

कनिष्ठ स्तरावरील सुवर्णकाळ

कनिष्ठ स्तरावरील मल्लांनी मात्र 2025 हे वर्ष भारतासाठी आशादायी ठेवले. 23 वर्षांखालील (यू-23) जागतिक स्पर्धेत सुजितने सुवर्णपदक जिंकले. तर 20 वर्षांखालील (यू-20) जागतिक स्पर्धेत भारताने अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांसह अव्वल देशांमध्ये स्थान मिळवले. 17 वर्षीय काजलने 72 किलो गटात आणि तपस्या गेहलावतने 57 किलो गटात सुवर्ण यश मिळवले. याशिवाय प्रिया मलिक, सारिका, श्रुती आणि रीना यांच्यासह ग्रीको-रोमनमध्ये सुमित मलिक आणि सूरज यांनी पटकावलेल्या पदकांमुळे भारताची ताकद दिसून आली.

विनेशचे पुनरागमन आणि नव्या नियमावलीची घोषणा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने पदकापासून वंचित राहिलेली विनेश फोगट आता पुन्हा मॅटवर परतणार आहे. काँग्रेस आमदार असूनही तिने आपल्या मुलासाठी पुन्हा कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कुस्ती महासंघाने नवीन निवड धोरण जाहीर केले असून, ऑलिम्पिक कोटा मिळवणाऱ्या खेळाडूंनाही आता संघात स्थान टिकवण्यासाठी निवड चाचणी द्यावी लागणार आहे. याशिवाय, पुढील महिन्यात ‌‘प्रो-रेसलिंग लीग‌’चे पुनरागमन होत असल्याने युवा खेळाडूंना वरिष्ठ स्तरावर झेप घेण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT