IND vs ZIM
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (दि.१३) खेळवला जात आहे.  
स्पोर्ट्स

IND vs ZIM : भारताचे निर्विवाद वर्चस्व

पुढारी वृत्तसेवा

10 विकेट्सने भारताचा विजय

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (दि.१३) खेळवण्यात आला. हा सामना भारताने 10 विकेट्सनी जिंकून मालिकेवर आपला कब्जा केला आहे. या सामन्यात गिल आणि जैस्वाल यांच्यामध्ये 156 धावांची भागीदारी झाली. सामन्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यजमान संघाने 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघ या मालिकेत 3-१ ने आघाडी मिळवून आपला नंबर 'वन'चा ताज राखला आहे. १५३ धावांचे लक्ष्‍य पूर्ण करण्यासाठी 16 षटके घेतली.

10व्या षटकांत भारताचे शतक पूर्ण

झिम्बाबेने दिलेल्या 153 धावांचा पाठलाग करत, भारताने शतकी संख्या 10 षटकांमध्ये गाठली आहे. यामध्ये कर्णधार गिल आणि जैस्वालची 100 धावाची भागीदारी सुद्धा झाली आहे. यामध्ये जैस्वाल नाबाद 65 आणि गिल नाबाद 37 धावांवर खेळत आहे. दोघांची तुफान फटेबाजी गतीने लक्ष्याच्या जवळ घेवून जात आहे.

जैस्वालचे तुफानी अर्धशतक

153 धावांचा पाठलाग करताना भारताला दोन्ही ओपनरांनी धडाकेबाडज सुरुवात करुन दिली आहे. यामध्ये सुंदर फटकेबाजी करत यशस्वी जैस्वालने दमदार अर्धशतक ठोकले आहे. त्याने 29 चेंडूत या सामन्यातील शतक पुर्ण केले. त्याच्या टी-20 करिअरमधील हे त्याचे पाचवे अर्धशतक आहे.

भारताची दमदार सुरुवात

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (दि.१३) खेळवला जात आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत 152 धावा चोपल्या. विजयासाठी भारताला 153 धावांचा पाठलाग करत आहे. दरम्यान भारताच्या सुरुवाती जोडीने धमाकेदार सुरुवात केली आहे. पॉवरप्लेनंतर सहा षटकांत भारताने 61 धावा केल्या. यामध्ये यशस्वी जैस्वालने तुफानी खेळी करत 26 चेंडूत 47 धावा केल्या. तर कर्णधार शुभमन गिलने त्याची साथ देत 10 चेंडूत 13 धावा करुन भारताला भक्कम सुरुवात करुन दिली आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (दि.१३) खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यजमान संघाने 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. आज मालिकेत निर्णायक आघाडी घेण्‍यासाठी टीम इंडियाला आता १५३ धावांचे लक्ष्‍य पूर्ण करावे लागले.

झिम्बाब्वेची चांगली सुरुवात

झिम्‍बाब्‍वेने चांगली सुरुवात झाली. नवव्‍या षटकापर्यंत नाबाद ६० धावांचा टप्‍पा पार पार केला. ९ व्‍या षटकात अभिषेक शर्माने ६३ धावांवर झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला. त्याने ३२ धावांवर खेळणार्‍या तदिवनाशे मारुमणीला तंबूत धाडले.

६७ धावांवर शिवम दुबेनेही झिम्बाब्वेला दुसरा झटका दिला. माधवरे याने २५ धावांची खेळी केली. ९२ धावांवर ब्रायन बेनेटच्या रूपाने झिम्बाब्वेला तिसरा धक्का बसला. वॉशिंग्टन सुंदरने त्‍याला 9 धावांवर बाद केले. १४ षटकानंतर ३ गडी गमावत झिम्बाब्वेने ९३ धावापर्यंत मजल मारली. कॅम्पबेल तीन धावा करून बाद झाला. यानंतर संघाला पाचवा धक्का कर्णधार रझा 28 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. मायर्सने 12, मदंडेने सात आणि अक्रमने चार (नाबाद) धावांची भर घातली. भारताकडून खलील अहमदने 2 तर देशपांडे, सुंदर, अभिषेक आणि शिवम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तुषार देशपांडे घेतली आंतरराष्‍ट्रीय T-20 कारकिर्दीतील पहिली विकेट

आजच्‍या सामन्‍यात तुषार देशपांडे याने आंतरराष्‍ट्रीय टी-20 मध्‍ये पदार्पण केले. १९ व्‍या षटकात त्‍याने झिम्बाब्वेचा कर्णधार रझाला बाद केले. रझाच्या रूपाने त्याला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले यश मिळाले

SCROLL FOR NEXT