IND vs WI 2nd Test Day 2 Live Pudhari Photo
स्पोर्ट्स

IND vs WI 2nd Test Day 2 : दुसऱ्या दिवसाअखेर भारताचा ५१८ धावांवर घोषित तर वेस्ट इंडिज 4 बाद 140 वर

Anirudha Sankpal

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. भारताने आपला पहिला डाव पाच बाद ५१८ धावांवर घोषित केला. तर वेस्ट इंडिजने दिवसअखेर चार बाद १४० धावांवर डाव घोषित केला.

पहिल्या दिवसाचा शतकवीर यशस्वी जयस्वाल १७५ धावांवर धावबाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलनं डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यानं शतकी खेळी करत दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातच भारताला ५०० धावांचा टप्पा पार करून दिला. शुभमनपूर्वी साई सुदर्शननं देखील दमदार फलंदाजी करत ८७ धावांची खेळी केली. नितीश कुमार रेड्डीनं देखील ४३ धावांचे योगदान दिलं. मात्र त्याला अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. त्यानंतर आलेल्या ध्रुव जुरेलनं देखील ४४ धावा केल्या. त्याला देखील आपल्या खेळीचं रूपांतर अर्धशतकी खेळीत करता आलं नाही. लंचनंतर भारतानं ५१८ धावांवर आपला डाव घोषित केला. त्यावेळी कर्णधार शुभमन गिल हा १२९ धावा करून नाबाद होता.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडीजची डाळ भारतीय फिरकीपटूंपुढे शिजल नाही. रविंद्र जडेजाने भेदक मारा करत विंडीजच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कुलदीपनं देखील एक विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. विंडीजकडून अथनाजेनं ४१ आणि चंद्रपॉलनं ३४ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला.

WI 107/3 (33.1)

वेस्ट इंजीजचे चंद्रपॉल आणि अथनाजे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. या दोघांनी विंडीजला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटच्या सत्रात कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी ही जोडी फोडली.

वWI 44/1 (16)

रविंद्र जडेजानं पहिला धक्का दिल्यानंतर वेस्ट इंडीज संघानं आपला डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अथनाजे आणि चंद्रपॉल यांनी संघाला अर्धशतकाच्या जवळ पोहचवलं.

WI 26/1 (11)

भारतानं आपला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केल्यानंतर विंडीजनं आपला दुसरा डाव सुरू केला. मात्र रविंद्र जडेजानं त्यांना पहिला धक्का दिला. त्यामुळे त्यांची चहापानापर्यंत अवस्था ही १ बाद २६ धावा अशी झाली आहे.

518-5 d (134.2 Ov) भारताचा डाव घोषित

भारतानं आपला पहिला डाव ५१८ धावांवर घोषित केला. भारताकडून गिलनं नाबाद १२९ धावा केल्या. तर ध्रुव जुरेलनं ४४ धावा केल्या.

IND 506/4 (132) 'कर्णधार' शुभमनचं भारतात पहिलं शतक

कर्णधार शुभमन गिलनं कर्णधार झाल्यानंतर मयादेशातलं आपलं पहिलं शतक झळकावलं. त्याला ध्रुव जुरेलनं चांगली साथ दिली. भारतानं १३२ षटकाच धावफलकावर ५०० चा टप्पा पार केला.

IND 425/4 (115)

शुभमन गिल अन् नितीश कुमार रेड्डी यांची जोडी जमली असं वाटत असतानाच वारिकेननं रेड्डीला ४३ धावांवर बाद केलं.

IND 401/3 (105.2)

भारत ४०० धावांच्या पार, गिल ६० तर रेड्डी ४० धावांवर नाबाद

IND 391/3 (103.4)

यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलनं भारताच्या डावाची सूत्र आपल्या हातात घेतली. त्यानं अर्धशतक ठोकत संघाला ४०० धावांच्या जवळ पोहचवलं आहे. त्याला नितीश कुमार रेड्डी हा ३२ धावा करून चांगली साथ देत आहे.

IND 349/3 (95)

यशस्वी जयस्वाल हा द्विशतकाच्या जवळ पोहतच असतानाच तो धावबाद झाला. भारताला तिसरा धक्का बसला आहे. यशस्वी बाद झाल्यानंतर आलेल्या नितीश रेड्डी आणि गिलनं भारताला ३५० धावांच्या जवळ पोहचवलं.

SCROLL FOR NEXT