पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा आठ गडी राखून पराभव करत आज श्रीलंकेने आशिया चषकावर आपली मोहाेर उमटवली. चामारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमा यांच्या दमदार अर्धशतकी खेळीने प्रथमच आशिया चषक जिंकण्याची कामगिरी या संघाने केली आहे. ( Women’s Asia Cup Final ) या सामन्यात भारताने यजमानांना 166 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेने आठ चेंडू शिल्लक असताना आठ गडी राखून सामना जिंकला.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध २० षटकात सहा विकेट गमावत १६५ धावा केल्या. भारताकडून स्मृतीने ४७ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ६० धावा केल्या, मात्र इतर भारतीय फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. श्रीलंकेकडून कविष्का दिलहरीने दोन बळी घेतले.
दुसऱ्या षटकातच भारताला यश मिळाले. विश्मी गुणरत्ने 1 धावा करून धावबाद झाली. त्यामुळे भारताला दुसऱ्याच षटकात पहिले यश मिळाले. दुसऱ्या षटकात पहिली विकेट गमावल्यानंतर श्रीलंकेने वेगाने धावा केल्या. संघाची धावसंख्या 2 षटकात 7 धावा होती. येथून संघाने 6 षटकांत 44 धावा केल्या.
श्रीलंकेचा डाव चामारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमा सावरला. या दोघांनीही 10 षटकांत 1 गडी गमावून 80 धावा केल्या . अटापट्टूने 33 चेंडूत अर्धशतक केले. दीप्ती शर्माने 12व्या षटकात श्रीलंकेला मोठा धक्का दिला. तनिे कर्णधार चमारी अटापट्टूला क्लीन बोल्ड केले. अटापट्टूने 41 चेंडूत 61 धावा केल्या. त्याने दुसऱ्या विकेटसाठी हर्षिता समरविक्रमासोबत ८७ धावांची भागीदारी केली. यानंतर हर्षिता समरविक्रमाने ५१ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. कविशा दिलहरीने त्याच्यासोबत ७३ धावांची भागीदारी केली.अटापट्टू आणि समरविक्रमाच्या खेळीने श्रीलंकेने १६६ धावांचे लक्ष्य आठ चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले.