IND vs SA 2nd Test Day 3 : भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील दुसर्या सामनातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून, दक्षिण आफ्रिकेने दुसर्या डावात विनाबाद २६ धावा करत ३१४ धावांची आघाडी घेतली आहे. रिकेल्टन १३ आणि मार्कराम १२ धावांवर नाबाद आहेत. पहिल्या डावाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेकडे २८८ धावांची आघाडी होती. परिणामी, पाहुण्या संघाची एकूण आघाडी ३१४ धावांवर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना त्यांच्या पहिल्या डावात ४८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताचा पहिला डाव २०१ धावांवर संपुष्टात आला. मार्को यान्सनने घेतले सहा बळी, तर सायमन हार्मरने तीन बळी घेतले. सोमवारी भारताने एकही विकेट न गमावता नऊ धावांवर खेळ सुरू केला आणि १९२ धावा करताना सर्व १० बळी गमावले. यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ५८ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने ४८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने फॉलोऑन लागू केला नाही आणि पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघ पहिल्या डाव २०१ धावांवर संपुष्टात आला. भारताला फॉलो-ऑन टाळण्यासाठी २८९ धावा करायच्या होत्या तथापि, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने फॉलो-ऑन लागू न करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा फलंदाजीस उतरला आहे. भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ५८ धावा केल्या, तर सुंदरने ४८ धावा केल्या. इतर फलंदाज कामगिरी करण्यात अपयशी ठरले. केएल राहुल २२ धावांवर, साई सुदर्शन १५ धावांवर, कर्णधार ऋषभ पंत सात धावांवर, रवींद्र जडेजा सहा धावांवर आणि नितीश रेड्डी १० धावांवर बाद झाले. ९५ धावांवर एक बाद झाल्यानंतर भारताने १२२ धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वी सात विकेट्स गमावल्या. ध्रुव जुरेलला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर सुंदरने कुलदीप यादवसोबत ७२ धावांची भागीदारी केली. सुंदर बाद झाल्यानंतर संघ २०१ धावांवर ऑलआऊट झाला. कुलदीप १९ धावांवर आणि बुमराहने पाच धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून जानसेनने सहा, तर सायमन हार्मरने तीन बळी घेतले. केशव महाराजने एक बळी घेतला.
८२ व्या षटकात भारताला नववा धक्का बसला. यान्सनचा सामना करताना त्याने मार्करामकडे सोपा झेल दिला. कुलदीपने तब्बल १३४ चेंडूचा सामना करत १९ धावा केल्या.
वॉशिग्टन सुंदरने कुलदीप यादवच्या साथीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला;पण ७९ व्या षटकात हार्मरच्या फिरकीने त्याला चकवा दिला. स्लीपमध्ये मार्करामने कोणतीही चूक न करता झेल पडकला. एक झुंजार खेळी ४८ धावांवर संपुष्टात आली आहे. वॉशिंग्टन सुंदरने ९२ चेंडूचा सामना करत ४८धावा केल्या. यामुळे २ चौकार तर १ षटकाराचा समावेश होता.
भारतावरील फॉलोऑनचे संकट कायम आहे. वॉशिग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी झूंज सुरु ठैवली आहे. दोघांनी कडवी झूंज देत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे. लंच ब्रेकपर्यंत भारताने ७ गडी गमावत १७४ धावा केल्या आहेत.
सात विकेट गमावल्यानंतर भारताने १४१ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या ४८९ धावांपेक्षा भारत ३४८ धावांनी मागे आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला आणखी १४९ धावा (एकूण २९०) करायच्या आहेत.
१२२ धावसंख्येवर भारताला सातवा धक्का बसला. जॅन्सनने जडेजाला हार्मरने झेलबाद केले. तो फक्त सहा धावा करू शकला. सध्या कुलदीप आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीजवर आहेत. भारताची सुरुवात चांगली झाली होती. ९५ धावांवर पहिली विकेट गमावली होती. मात्र यानंतर १२२ धावांपर्यंत पोहोचताना संघाने आणखी सहा विकेट गमावल्या. फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला आणखी १७० धावा (एकूण २९०) करायच्या आहेत. यशस्वी ५८ धावा, राहुल २२ धावा, सुदर्शन १५ धावा, पंत ७ धावा आणि रेड्डी १० धावा घेऊन पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. तर, जुरेल खाते उघडू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून जॅन्सनने चार बळी घेतले. तर, हार्मरने दोन बळी घेतले. महाराजने एक विकेट घेतली.
जॅन्सनचा शॉर्ट बॉल चुकविण्याचा नितीश रेड्डी प्रयत्न केला;पण बॉल ग्लॉजवर लागून उडाला. मार्करामने स्वतःला झोकून देत अफलातून झेल पकडला. भारताला ११९ धावांवर सहावा धक्का बसला आहे.
भारताला १०५ धावांवर पाचवा धक्का बसला. कर्णधार ऋषभ पंतला मार्को जॅनसेनने सात धावांवर बाद केले. जडेजा आणि नितीश रेड्डी सध्या क्रीजवर आहेत. भारत एकेकाळी १ बाद ९५ धावांवर होता. आता धावसंख्या ५ बाद १०५ आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी संघाला एकूण २९० धावांची आवश्यकता आहे.
भारताला १०२ धावांवर चौथा झटका बसला. केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. भारताची आघाडीची फळी पुन्हा एकदा कोसळली आहे. केशव महाराजांनी केएल राहुलला बाद केले. सायमन हार्मरने यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शनला बाद केले. जुरेलला मार्को जानसेनने बाद केले.
भारताने तिसऱ्या दिवशी दोन तासांत तीन विकेट गमावल्या. केशव महाराजने केएल राहुलला बाद केले. यानंतर सायमन हार्मरने यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शनला बाद केले. यशस्वी ५८, राहुल २२ आणि सुदर्शन १५ धावांवर बाद झाले.
भारताला ९५ धावांवर दुसरा धक्का बसला. यशस्वी जयस्वालला सायमन हार्मरने झेलबाद केले. तो ९७ चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा काढून बाद झाला.
यशस्वीने त्याचे १३ वे कसोटी अर्धशतक झळकावले. भारताने एका विकेटच्या मोबदल्यात ९० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. साई सुदर्शन सध्या यशस्वीसोबत क्रीजवर आहे. भारत अजूनही दक्षिण आफ्रिकेपेक्षा ३९०+ धावांनी पिछाडीवर आहे.
भारताला पहिला धक्का ६५ धावांवर बसला. केशव महाराजच्या गोलंदाजीवर केएल राहुल मार्करामने झेलबाद झाला. तो फक्त २२ धावा करू शकला. यशस्वी जयस्वाल सध्या ४२ धावांसह क्रीजवर आहे. त्याच्यासोबत साई सुदर्शन आहे. भारत अजूनही दक्षिण आफ्रिकेपेक्षा ४२४ धावांनी पिछाडीवर आहे.
अर्ध्या तासाच्या खेळानंतर, भारताने बिनबाद ४० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सध्या, राहुल आणि यशस्वी २८ धावांसह क्रिजवर आहेत. दरम्यान, दुसरा दिवस पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेचा होता, विशेषतः मुथुस्वामीने भारतीय गोलंदाजांना त्रास दिला. दिवसाच्या खेळाच्या शेवटी, भारताने पहिल्या डावात नऊ धावा केल्या. खेळ संपला तेव्हा, यशस्वी जयस्वाल सात धावांसह आणि केएल राहुल दोन धावांसह क्रिजवर होते. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावा केल्या आहेत.