स्पोर्ट्स

IND W vs PAK W Match : टीम इंडियाची मोठी फसवणूक, भारताने टॉस जिंकूनही मॅच रेफरींचा पाकिस्तानच्या बाजूने कौल

Ind vs Pak महिला विश्वचषक सामन्याच्या टॉसवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

रणजित गायकवाड

India vs Pakistan Women’s ODI World Cup toss controversy

कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला विश्वचषक स्पर्धेच्या लीग सामन्यादरम्यान मॅच रेफरींनी एक घोटाळा घडवून आणला. या हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान टॉस दरम्यान एक मोठी चूक झाली, जी दुरुस्त करता आली नाही. मॅच रेफरीने पाकिस्तानच्या बाजूने टॉसचा कौल दिला. ज्यामुळे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर नाराज दिसली. एक प्रकारे टीम इंडियाची उघडपणे फसवणूक झाल्याचे टीका होत आहे. ही घटना कॅमे-यामध्ये कैद झाली आहे.

खरंतर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस टाकला. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने कॉल केला आणि म्हणाली - टेल... यानंतर, मॅच रेफरी शँड्रे फ्रिट्झ आणि टॉस प्रेझेंटर मेल जोन्स म्हणाले - हेड्स हा कॉल आहे आणि निकाल हेड्सचा होता. अशाप्रकारे, भारताच्या बाजूने टॉसचा निर्णय द्यायला हवा होता, पण पाकिस्तानच्या बाजूने कौल देण्यात आला. यानंतर, पाकिस्तानच्या कर्णधाराला थेट विचारण्यात आले की तिला काय करायचे आहे, त्यानंतर सना हिनेही विलंब न करता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

क्रिकेटमध्ये अशा चुका सहसा घडत नाहीत. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही ते लक्षात आले नाही, अन्यथा तिने आवाज उठवला असता. आवाजामुळे किंवा इतर काही कारणामुळे हरमनप्रीत कौरला फातिमा सनाचा आवाज ऐकू आला नसण्याची शक्यता आहे, परंतु टॉसचा निकाल जाहीर करण्याची जबाबदारी मॅच रेफरी आणि मॅच प्रेझेंटरची आहे. सामना आधीच सुरू झाला आहे आणि या मुद्द्यामुळे आणखी वाद निर्माण होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT