स्पोर्ट्स

ICC T20 Mens World Cup : पाकविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाच ‘भारी’, जाणून घ्या आकडेवारी

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क| IND vs PAK : आत्मविश्वासाने भरलेला आणि परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या भारतीय संघाचा रविवारी (दि.9) पाकिस्तानशी सामना होणार आहे. हा सामना 34,000 प्रेक्षक क्षमता असलेल्या नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आजपर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान अनेक वेळा आमने-सामने आले आहेत. जाणून घेवयात भारत-पाकिस्तान यांच्यातील आकडेवारी.

पाकिस्तानवर टीम इंडियाच 'भारी'

वन-डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान भारताला टक्कर देत असला तरी टी-20 क्रिकेटमधील चित्र पूर्णपणे वेगळे आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 12 टी-20 सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 9 सामन्यात विजय मिळवले आहेत. तर, पाकिस्तानला फक्त 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे.

टी-20 विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 6 सामने झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानला एकच विजय मिळाला आहे. यामध्ये 2021 साली यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरूद्ध 10 गडी राखून विजय मिळवला होता. तर भारताने बॉल आऊटसह 5 सामने जिंकले आहेत.

टी-20 वर्ल्डकपसाठी दोन्ही संघ :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत(विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान(विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान शाह माझे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT