India Vs Pakistan Final pudhari
स्पोर्ट्स

India Vs Pakistan Final: १५ वर्षाच्या वैभवला पाकिस्तानने डिवचले... सईम आयुबने पाळणा हलवला, त्याच षटकात अभिषेकने जागा दाखवली

वैभवला डिवचणाऱ्या सईम आयुबचा अभिषेकने घेतला चांगला समाचार

Anirudha Sankpal

India Vs Pakistan Final Asian Games 2026: एशियन गेम्समधील पुरूष क्रिकेट स्पर्धेत गोल्ड मेडलसाठी आज आशियातील दोन सर्वात मोठे प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीत करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीकडून महत्वाच्या सामन्यात मोठी अपेक्षा होती. मात्र त्याला सईम आयुबने १५ धावांवर बाद केलं. मात्र यानंतर सईम आयुबने त्याला डिवचण्याचा देखील प्रयत्न केला.

नेमकं काय झालं

सामन्याच्या दुसऱ्या षटकात शान मसूदला १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने दोन षटकार ठोकत दिमाखात सुरूवात केली होती. त्यानंतर अभिषेक शर्माने देखील चौकार मारत त्याच्या षटकात चांगल्याच धावा कुटल्या. मात्र तिसऱ्या षटकात सईम आयुबच्या पहिल्याच चेंडूवर स्विच हिट मारण्याच्या नादात वैभव सूर्यवंशी उस्मान खान कडे झेल देऊन बाद झाला.

यानंतर सईम आयुबने एक आक्षेपार्ह सेलिब्रेशन केलं. त्याने हाताने पाळणा हालवण्याचे हावभाव करत वैभव अजून बच्चा आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अभिषेक शर्माने त्याच षटकात सईमला दोन चौकार आणि एक षटकार मारत त्याची जागा दाखवून दिली.

भारताना २११ धावांचा डोंगर उभारला

भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर २११ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर अभिषेक शर्माने ६१ धावांची खेळी केली. त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये तिलक वर्मान २२ चेंडूत ५२ तर शिवम दुबेने १५ चेंडूत २७ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने २१ तर इशान किशनने २० धावांचे योगदान दिले. याच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर २० षटकात ६ बाद २११ धावा केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT