भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताचा पहिला डाव ४६ धावांवरच आटोपला आहे.  (Image source- X)
स्पोर्ट्स

घरच्या मैदानावर टीम इंडियाची सर्वात खराब कामगिरी, ३७ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला!

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा बुधवारचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता. काल टॉसही झाला नव्हता. आज गुरुवारी टॉस झाला. भारताने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय चुकीचा ठरला.भारताचा पहिला डाव अवघ्‍या ४६ धावांवर आटोपला आहे. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात नीच्चांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी १९८७ मध्‍ये मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटीत संघ ७५ धावांवर ऑलआऊट झाला होता.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय ठरला चुकीचा

बेंगळुरू कसोटीत भारताचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय चुकीचा ठरला. ढगाळ वातावरणात टीम इंडियाचे डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. संघाच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे.यापूर्वी १९९९ मध्‍ये न्‍यूझीलंड संघाने मोहाली कसोटीत भारताचे ५ फलंदाज शून्‍यांवरती बाद केले होते.

पहिल्‍या डावात ऋषभ पंतच्‍या सर्वाधिक २० धावा

भारताच्‍या पहिल्‍या डावात ऋषभ पंतने सर्वाधिक २० धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने १३ धावांची खेळी केली. रोहित शर्मा दोन धावा करून बाद झाला तर जसप्रीत बुमराह एक धाव काढून बाद झाला. न्‍यूझीलंडनच्‍या मॅट हेन्रीने 5, तर विल्यम ओ'रुर्कने 3 विकेट्स घेतल्या आहेत. आता भारताच्‍या दुसर्‍या डावातील खेळाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

टीम इंडियाची नीच्‍चांकी धावसंख्‍या

2020 मध्ये ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36

1974 मध्ये लंडनमध्ये इंग्लंडविरुद्ध 42

2024 मध्ये बेंगळुरू येथे न्यूझीलंडविरुद्ध 46 (पहिला डाव)

1947 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58

1952 मध्ये मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध 58

घरच्या मैदानावर सर्वात कमी धावसंख्‍या 1987 दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध 75-ऑलआउट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT