स्मृती मानधना 
स्पोर्ट्स

स्मृती मानधनाचा धमाका! बनली ‘अशी’ कामगिरी करणारी दुसरी भारतीय फलंदाज

Smriti Mandhana : स्मृती हरमनप्रीतपेक्षा खूप पुढे

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात कर्णधार स्मृती मानधनाने चमत्कार केला. तिची खेळी लहान होती पण नेहमीप्रमाणे ती प्रभावी ठरली. नवीन सलामीवीर प्रतिका रावल संथ फलंदाजी करत असताना, स्मृतीने वेगवान फलंदाजीचे प्रदर्शन केले. तिच्या या खेळीने संघाला जलद सुरुवात मिळाली. या काळात, तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक नवीन टप्पा गाठला, जो आतापर्यंत भारतासाठी फक्त दोन महिला फलंदाजांना साध्य करता आला आहे.

मानधनाच्या वनडेमध्ये 4000 धावा पूर्ण

स्मृती मानधना आता भारतासाठी एकदिवसीय सामन्यात 4000 अधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे. तिच्या पुढे फक्त मिताली राज आहे, जिने सात हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. मिताली राजने 232 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7805 धावा केल्या आहेत. मानधनाने आतापर्यंत 95 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4001 धावा केल्या. तिच्या आधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी हरमनप्रीत कौरही स्मृती मानधनापेक्षा खूपच मागे आहे.

हरमनप्रीतपेक्षा स्मृती खूप पुढे

हरमनप्रीत कौरने 141 एकदिवसीय सामने खेळून फक्त 3803 धावा केल्या आहेत. म्हणजे स्मृती तिच्यापेक्षा खूप पुढे आहे. एक युक्तिवाद असा करता येईल की स्मृती सलामीवीर म्हणून येते, तर हरमनप्रीत कौर खालच्या क्रमात फलंदाजी करते. स्मृतीची एकदिवसीय सामन्यात सरासरी 44.95 आणि हरमनप्रीत कौरची सरासरी 37.28 आहे. म्हणजे इथेही हरमनप्रीत कौर स्मृती मानधनाच्या मागे आहे.

प्रतिका रावलनेची शानदार खेळी

आजच्या सामन्यात, स्मृती मानधनाने 29 चेंडूत 41 धावांची जलद खेळी केली. यादरम्यान तिने 6 चौकार आणि एक षटकार मारला. दुसरीकडे, प्रतीका रावलने सुरुवात धिम्या गतीने केली पण त्यानंतर तिने वेगाने धावा काढल्या. प्रतिकाने तिच्या खेळीदरम्यान 96 चेंडूत 89 धावा केल्या. पण, तिचे शतक हुकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT