स्पोर्ट्स

India vs England Test series 2025 : टीम इंडियासाठी इंग्लंडचा दौरा आव्हानात्मक, आतापर्यंत फक्त ‘इतके’च सामने जिंकले, जाणून घ्या आकडेवारी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला गेला. तेव्हापासून दोन्ही संघ एकमेकांच्या देशात दौरे करत आहेत. या परंपरेत आजपर्यंत खंड पडलेला नाही.

रणजित गायकवाड

india vs england test series 2025 head to head record

भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला जात आहे. ही दीर्घ मालिका पुढील महिन्यात सुरू होईल. पहिला सामना 20 जूनपासून खेळला जाईल, परंतु त्यापूर्वी बीसीसीआयला संघ निवडीसाठी कसरत करावी लागणार आहे. तथापि, इंग्लंडचा दौरा टीम इंडियासाठी कधीच सोपा नव्हता. जर यावेळीही आव्हान कठीण असेल तर ते आश्चर्यकारक नसावे. इंग्लिश खेळपट्ट्यांवर यजमान संघाचा पाहुण्या भारतीय संघाविरुद्ध नेहमीच वरचष्मा राहिला आहे. जाणून घेऊया आकडेवारी.

भारत आणि इंग्लंडमधील क्रिकेट संबंध खूप जुने आहेत. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीपासूनच या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळल्या जात आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून दोन्ही संघ एकमेकांच्या देशात दौरे करत आहेत. या परंपरेत आजतागायत खंड पडलेला नाही. दरम्यान, जर आपण दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डवर नजर टाकली तर, भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत 136 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 35 आणि इंग्लंडने 51 कसोटी जिंकल्या आहेत. तर, 50 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

विराट-रोहितच्या अनुपस्थितीमुळे वाढला तणाव

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत ब्रिटिशांचा वरचष्मा आहे. यावेळी ही मालिका इंग्लंडमध्ये खेळली जात आहे, त्यामुळे यजमान संघ पूर्ण उत्साहाने खेळेल यात शंका नाही. एवढेच नाही तर यावेळी दोन महान भारतीय खेळाडू म्हणजेच विराट कोहली आणि रोहित शर्मा हे संघासोबत नसतील. त्यांनी नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या दोघांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला अडचणींचा सामना करावा लागला तर त्यात आश्चर्यकारक ठरणार नाही.

भारताचा अनुभवहीन संघ इंग्लंडला जाणार

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. तरी, शुभमन गिल संघाचा नवा कर्णधार असू शकतो असे मानले जात आहे. बीसीसीआयकडून लवकरच संघ जाहीर केला जाईल अशी अपेक्षा आहे, पण हे निश्चित आहे की हा संघ फारसा अनुभवी नसेल. त्यामुळे निश्चितच इंग्लंड संघाचे वर्चस्व राहण्याची दाट शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT