स्पोर्ट्स

IND vs ENG ODI : भारताचा 142 धावांनी दणदणीत विजय, इंग्लंडचा सुपडासाफ

पुढारी वृत्तसेवा

भारत विजयाच्या जवळ

इंग्लंड क्लीन स्वीपपासून 1 विकेट दूर आहे. हार्दिक पंड्याने इंग्लंडला 9 वा धक्का दिला आहे. मार्क वूड 9 धावा करून बाद झाला.

आदिल रशीद खाते न उघडताच बाद

हार्दिक पंड्याने इंग्लंडला आठवा धक्का दिला. त्याने आदिल रशीदला खाते न उघडताच माघारे धाडले.

लिव्हिंगस्टोन नऊ धावा करून बाद

इंग्लंडला लियाम लिव्हिंगस्टोनच्या रूपाने सातवा धक्का बसला. त्याला केएल राहुलने स्टंपिंगद्वारे बाद केले. तो फक्त नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

इंग्लंडला सहावा धक्का

इंग्लंडला हॅरी ब्रुकच्या रूपाने सहावा धक्का बसला. त्याला हर्षित राणाने बोल्ड केले. तो 19 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.

इंग्लंडला पाचवा धक्का

जोस बटलरच्या रूपाने इंग्लंडला पाचवा धक्का बसला. त्याला हर्षित राणाने बळी बनवले. तो सहा धावा करून बाद झाला. लियाम लिव्हिंगस्टोन सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

रूट पॅव्हेलियनमध्ये

इंग्लंडला चौथा धक्का अक्षर पटेलने दिला. त्याने जो रूटला बाद केले. तो 24 धावा करून बाद झाला. जोस बटलर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

बँटन बाद

इंग्लंडला तिसरा धक्का 126 धावांवर बसला. कुलदीप यादवने बँटनची विकेट घेतली. तो 38 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. हॅरी ब्रुक पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

इंग्लंडला दुसरा धक्का

फिल साल्टच्या रूपाने इंग्लंडला दुसरा धक्का बसला. तो देखील अर्शदीप सिंगच्या चेंडूवर झेलबाद झाला. अक्षर पटेलने झेल पकडला. साल्ट 23 धावा करून बाद झाला. जो रूट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

इंग्लंडला पहिला धक्का

इंग्लंडला पहिला धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला. अर्शदीप सिंगने त्याला आपला बळी बनवले. तो 34 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. टॉम बँटन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

इंग्लंडचा डाव सुरू

इंग्लंडचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाला आहे. बेन डकेट आणि फिल सॉल्ट फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी उतरले.

इंग्लंडचा डाव सुरू

इंग्लंडचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाला आहे. बेन डकेट आणि फिल सॉल्ट फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी उतरले.

भारताचे इंग्लंडसमोर ठेवले 357 धावांचे लक्ष्य

शुभमन गिलचे शतक आणि विराट कोहली-श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांमुळे भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 357 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. भारतीय संघाचा डाव 50 षटकांत 356 धावांवर संपला. अहमदाबादमध्ये एकदिवसीय सामन्यात केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. इंग्लंडकडून फिरकी गोलंदाज आदिल रशीदने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. भारताकडून गिलने 102 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह 112 धावा केल्या, तर श्रेयसने 78 आणि कोहलीने 52 धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर आलेला केएल राहुल 40 धावा करून बाद झाला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात स्वस्तात बाद झाला. पण गिल आणि कोहलीने भारताचा डाव सांभाळला. 122 धावसंख्येवर भारताला दुसरा धक्का बसला. विराट कोहली 52 धावा करून बाद झाला. त्याला आदिल रशीदने एकदिवसीय सामन्यात पाचव्यांदा बाद केले. कोहलीने गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली.

कोहली बाद झाल्यनतर अय्यरनेही गिलला चांगली साथ दिली. दोघांमध्ये 93 चेंडूत 104 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, उपकर्णधार गिलने शतक झळकावले. त्याने 95 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे या फॉरमॅटमधील त्याचे सातवे शतक ठरले. त्यानंतर अय्यरने अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 20 वे अर्धशतक ठरले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुलनेही या सामन्यात आपली ताकद दाखवली. पण अर्धशतकाने त्याला हुलकावणी दिली. त्याने 29 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 40 धावा काढल्या. हार्दिक पंड्या (17), अक्षर पटेल (13) यांनी उपयुक्त योगदान दिले ज्यामुळे भारतीय संघ 350 धावांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाला. रशीदने 64 धावा देऊन 4 बळी घेतले. मार्क वूडने दोन, तर साकिब महमूद, गस अ‍ॅटकिन्सन आणि जो रूटने प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताला सातवा धक्का

भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. राहुलने 29 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 40 धावा काढल्या आणि बाद झाला.

भारताला सहावा धक्का

अक्षर पटेलच्या रूपाने भारतीय संघाला सहावा धक्का बसला. अक्षर पटेल 12 चेंडूत 13 धावा काढून बाद झाला. जो रूटने त्याची विकेट घेतली.

भारताचा स्कोअर 300 च्या पुढे

भारतीय संघाने 300 धावांचा टप्पा ओलांडला. भारताकडून शुभमन गिलने शतक झळकावले, तर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर शतके झळकावून बाद झाले.

भारताला पाचवा धक्का

भारताला पाचवा धक्काही आदिल रशीदने दिला. त्याने हार्दिक पंड्याला आपला बळी बनवले. तो 17 धावा करून बाद झाला.

शुबमन गिल बाद

फिरकी गोलंदाज आदिल रशीदने शुबमन गिलला बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. गिल बाद झाल्यानंतर त्याच्या आणि श्रेयस अय्यरमधील 104 धावांची भागीदारी संपुष्टात आली. गिलने शानदार फलंदाजी केली आणि त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. गिलने 102 चेंडूत 14 चौकार आणि तीन षटकारांसह 112 धावा काढल्या आणि तो बाद झाला.

श्रेयसचे अर्धशतक

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले. श्रेयसचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 20 वे अर्धशतक आहे. श्रेयस आणि गिल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी पूर्ण केली.

शुबमन गिलचे शतक

उपकर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले. त्याने 95 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे या फॉरमॅटमधील त्याचे सातवे शतक आहे. शुभमन या मालिकेत उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि त्याने तिन्ही सामन्यांमध्ये आपल्या खेळीने प्रभावित केले आहे. भारताची धावसंख्याही 200 च्या पुढे गेली.

भारताला दुसरा धक्का

122 धावसंख्येवर भारताला दुसरा धक्का बसला. विराट कोहली 52 धावा करून बाद झाला. त्याला आदिल रशीदने एकदिवसीय सामन्यात पाचव्यांदा बाद केले. कोहलीने गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली.

विराट आणि गिलचे अर्धशतक

भारताचे स्टार फलंदाज शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अहमदाबादमध्ये चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. दोघांनीही आपले अर्धशतक पूर्ण केले. शुभमन गिलने मालिकेतील त्याचे सलग दुसरे अर्धशतक आणि त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 16 वे अर्धशतक झळकावले. त्याने 51 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहलीनेही 51 चेंडूत अर्धशतक झळकावले. मालिकेतील हे त्याचे पहिले अर्धशतक आणि एकदिवसीय कारकिर्दीतील 73 वे अर्धशतक ठरले.

भारताचा धावसंख्या १०० पार, गिलने अर्धशतक झळकावले

१७ षटकांत एक विकेट गमावल्यानंतर भारताने १०४ धावा केल्या. शुभमन गिलने मालिकेतील त्याचे सलग दुसरे अर्धशतक आणि त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १६ वे अर्धशतक झळकावले. त्याने ५१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहली देखील त्याच्या अर्धशतकाच्या जवळ आहे.

कोहली-गिल क्रीजवर

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळली. सहा षटकांनंतर भारताने आतापर्यंत एका विकेटच्या मोबदल्यात 40 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या मार्क वूडने रोहितला स्वस्तात बाद केले, परंतु कोहली आणि गिलने संयमी खेळी करत भारताला सावरले.

 भारताला पहिला धक्‍का, राेहित शर्मा आऊट

मालिकेतील दुसर्‍या वनडे सामन्‍यात धमाकेदार शतकी खेळी साकारलेला कर्णधार राेहित शर्मा आज झटपट तंबूत परतला. मार्क वडूने त्‍याला यष्‍टीरक्षक फिलिप साल्‍टकरवी झेलबाद केले. भारताला ६ धावांवर पहिला धक्‍का बसला आहे.

या सामन्यातील दोन्ही संघ

भारत प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (विकेटकीपर), टॉम बँटन, लियाम लिव्हिंगस्टोन, गस अ‍ॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 142 धावांनी पराभव करत मालिका 3-0 ने जिंकली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारतीय संघाने शुभमन गिलचे शतक, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 10 गडी गमावून 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंड संघाला 34.2 षटकांत 10 गडी गमावून केवळ 214 धावा करता आल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT