भारत आणि बांगलादेश यांच्यातील महिला विश्वचषकातील २८ वा सामना आज रविवारी (दि. २६) डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळला जात आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने तीन बदल केले आहेत. रिचा घोष, क्रांती गौड आणि स्नेह राणा यांच्याऐवजी उमा छेत्री, राधा यादव आणि अमनजोत कौर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. उमा पदार्पण करत आहे. पावसामुळे टॉस ३५ मिनिटे उशिरा झाला. भारतीय संघाने आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे, जिथे त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. दुसरीकडे, बांगलादेश संघ आतापर्यंत स्पर्धेत फक्त एकच सामना जिंकू शकला आहे.
श्री चरणीने रितू मोनी हिला बाद करून बांगला देश संघाला नववा झटका दिला. बॅटच्या बाहेरील भागाला लागून चेंडू हवेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उसळला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या रॉड्रिग्सने सहज झेल घेतला.
राधा यादवने २६ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राबिया खानला ३ धावांवर बाद केले. ही बांगला देशची आठवी विकेट होती. बांगलादेशने २६ षटकांत ८ बाद १०८ धावा केल्या.
शर्मिन आक्रमक फलंदाजी करत होती, मात्र ३६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर श्रीचरणीच्या गोलंदाजीवर तिने अरुंधतीकडे झेल दिला. यासह तिची खेळी संपुष्टात आली. या विकेटमुळे बांगलादेशची फलंदाजी पूर्णपणे डगमगली.
भारताला सहावी विकेट फिरकीपटू राधा यादवने मिळवून दिली. राधाने नाहिदा अख्तरला केवळ ३ धावांवर (५ चेंडूंत) तंबूचा रस्ता दाखवला. २४ षटकांच्या समाप्तीनंतर बांगलादेश संघाने ६ गडी गमावून १०१ धावा केल्या.
बांगलादेशची पाचवी विकेट ९४ धावांवर पडली. अमनजोत कौरने शोर्ना अख्तरला बाद केले. तिला फक्त दोन धावा करता आल्या.
बांगलादेशने ९१ धावांवर चार विकेट गमावल्या. त्यांना तिसरा धक्का कर्णधार निगार सुलतानाच्या रूपात बसला ती फक्त नऊ धावांवर धावचीत झाली. त्यानंतर राधा यादवने शोभना मोस्त्रीला बाद केले.
पावसामुळे पुन्हा एकदा षटके कमी करण्यात आली आहेत. आता खेळ प्रति डाव २७ षटकांमध्ये खेळवला जाईल.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्या सुरू असलेला विश्वचषक सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. खेळ थांबवला तेव्हा बांगलादेशने १२.२ षटकांत दोन गडी गमावून ३९ धावा केल्या होत्या.
बांगलादेशची फलंदाज रुबाया ३२ चेंडूत १३ धावा करून बाद झाली. दीप्तीला यश मिळाले.
रेणुका सिंह ठाकूरने सुमैय्या अख्तरला बाद केले. श्री चरणीने अखतरचा झेल घेतला. सामन्याच्या पहिल्याच षटकात रेणुका सिंहने भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकलेल्या एका आखूड आणि रुंद चेंडूवर सुमैय्या अख्तरने तो मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, बॅटची बाहेरील कडा घेऊन चेंडू थेट शॉर्ट थर्ड मॅनला उडाला. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या श्री चरणीने कोणतीही चूक न करता हा सोपा झेल सुरक्षितरित्या टिपला. अख्तरने २ धावा (६ चेंडू) केल्या.