स्पोर्ट्स

4483 चेंडूंनंतर बुमराहला बसला षटकार! ‘या’ फलंदाजाचा पराक्रम(Video)

Bumrah vs Konstas : बुमराहच्या गोलंदाजीतील विशेष परंपरा खंडीत

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bumrah vs Konstas : जसप्रीत बुमराह हा क्रिकेट जगतातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा टीम इंडिया कठीण परिस्थितीत सापडते तेव्हा भारतीय कर्णधार बुमराहकडे मदतीसाठी धावतो. बुमराहने गेल्या काही वर्षांत आपला दबदबा निर्माण केला आहे. पण तो एखाद्या सामन्यात कमकुवत दिसू लागला तर काय? ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी कसोटीत बुमराह गोलंदाजीला आला तेव्हा असेच काहीसे घडले. टीम इंडिया मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळत आहे. या सामन्यादरम्यान बुमराहच्या गोलंदाजीतील एक विशेष परंपरा खंडीत झाली. 4483 चेंडूंनंतर बुमराहविरुद्ध एका फलंदाजाने हा पराक्रम केला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून टीम इंडियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सॅम कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. सॅम कॉन्स्टास भारताविरुद्ध उस्मान ख्वाजासोबत सलामीला आला. यादरम्यान त्याने जसप्रीत बुमराह गोलंदाजीतील एक परंपरा मोडली. त्याने बुमराहविरुद्ध ऐतिहासिक षटकार ठोकला. हा षटकार 4483 चेंडूंनंतर आला आहे. पदार्पण करणाऱ्या खेळाडूने हा दीर्घ क्रम संपुष्टात आणला. कॉन्स्टासने सामन्याच्या 6.2 षटकात हा षटकार लगावला. कॉन्स्टास तिथेच थांबला नाही. त्याने बुमराहविरुद्ध आणखी एक षटकार ठोकला. 10व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने हा षटकार खेचला.

कॉन्स्टसचे वेगवान अर्धशतक

सॅम कॉन्स्टासने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. प्लेइंग 11 मध्ये तो या स्थानासाठी का पात्र आहे हे त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात सिद्ध केले. त्याच्या समावेशाचा ऑस्ट्रेलियन संघाला फायदा झाला. या संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती, पण मेलबर्न कसोटीत सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी 89 धावांची सलामी दिली. या जोडीने लवकर विकेट गमावू नये याची काळजी घेतली. कॉन्स्टासने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अवघ्या 51 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो 65 चेंडूत 60 धावा करून ऑस्ट्रेलियाचा पहिला बळी ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT