स्पोर्ट्स

Vibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीचे अवघ्या ६३ चेंडूत झंझावाती शतक, १० डावांत तिसऱ्यांदा गाठला शंभरीचा टप्पा

वैभवने द. आफ्रिकेच्या U-19 संघाविरुद्ध वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ७४ चेंडूत १२७ धावांची स्फोटक खेळी साकारली.

रणजित गायकवाड

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील (U-19) संघांमधील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार वैभव सूर्यवंशी याने आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत शानदार शतक झळकावले. दुसऱ्या सामन्यात अवघ्या २४ चेंडूत ६८ धावांची आतषबाजी करून 'सामनावीर' ठरलेल्या वैभवने या सामन्यात ७४ चेंडूत १२७ धावांची स्फोटक खेळी साकारली.

धावांचा पाऊस आणि विक्रमी कामगिरी

१४ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत त्याने भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे. विशेष म्हणजे, सर्व फॉरमॅटचा विचार करता, मागील १० डावांमध्ये वैभवच्या बॅटमधून आलेले हे तिसरे शतक आहे.

  • विजया हजारे करंडक : पहिल्याच सामन्यात १९० धावांची खेळी.

  • U-19 आशिया चषक : संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध १७१ धावा.

  • मागील १० डावांचा आढावा : ३ शतके आणि २ अर्धशतकांसह एकूण ६८८ धावा.

वैभवने आपल्या १२७ धावांच्या खेळीत ९ चौकार आणि १० उत्तुंग षटकार लगावले. त्याने उपकर्णधार अ‍ॅरोन जॉर्जच्या साथीने सलामीसाठी २५.४ षटकांत २२७ धावांची भक्कम भागीदारी रचली. भारताने यापूर्वीच मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली असून, आता टीम इंडियाची नजर दक्षिण आफ्रिकेला 'क्लीन स्वीप' देण्यावर आहे.

भारतीय संघात दोन बदल

मालिका आधीच खिशात असल्याने भारतीय संघाने या सामन्यात आपल्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये दोन बदल केले आहेत. दीपेश देवेंद्रन आणि खिलन पटेल यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी उद्धव मोहन आणि हेनिल पटेल यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, राहुल कुमार आणि युवराज गोहिल यांना संपूर्ण मालिकेत राखीव खेळाडू म्हणून बाकावरच बसावे लागले.

U-19 भारतीय संघ : वैभव सूर्यवंशी (कर्णधार), एरोन जॉर्ज (उपकर्णधार), अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), वेदांत त्रिवेदी, हरवंश पंगालिया, आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, मोहम्मद एनान, खिलान पटेल, उद्धव मोहन, हेनिल पटेल

U-19 दक्षिण आफ्रिका संघ : मुहम्मद बुलबुलिया (कर्णधार), जोरिच वान शल्कविक, अदनान लागाडियन, जेसन राउल्स, डेनियल बोसमैन, पॉल जेम्स, लेथाबो फाह्लामोहलाका (यष्टीरक्षक), कॉर्न बोथा, माइकल क्रुइस्कैम्प, जे जे बैसन, एनटांडो सोनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT