गुवाहाटी; वृत्तसंस्था : अफगाणिस्तानविरुद्ध पुढील महिन्यात होणार्या एकमेव कसोटी आणि 3 सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी आज (मंगळवार, दि. 19) गुवाहाटी येथे राष्ट्रीय निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’ आणि रोहित शर्माच्या तंदुरुस्तीवर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.
बुमराहला एका मालिकेतून विश्रांती?
2027 मध्ये होणार्या वन डे विश्वचषकासाठी अद्याप बराच अवधी असल्याने बुमराहला दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळवण्याची कोणतीही घाई निवड समितीला नाही. साहजिकच, एका फॉरमॅटमधून त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. दुसरीकडे, रोहित जर वन डे सामन्यात पूर्ण वेळ क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तरच त्याचा संघात समावेश केला जाईल.
भारत-अफगाण मालिकेची रूपरेषा
कसोटी मालिका
तारीख लढत वेळ ठिकाण
6 ते 10 जून पहिली क सोटी स. 9.30 वा. चंदीगड
वन डे मालिका
तारीख लढत वेळ ठिकाण
14 जून पहिली लढत दु. 1.30 वा. धर्मशाळा
17 जून दुसरी लढत दु. 1.30 वा. लखनौ
20 जून तिसरी लढत दु. 1.30 वा. चेन्नई