स्पोर्ट्स

India-Pakistan War IPL 2025 : पाकिस्तानच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्यामुळे पंजाब-दिल्ली IPL सामना रद्द, धर्मशाला स्टेडियममध्ये ‘ब्लॅकआऊट’

पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामना रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानने भारतातील तीन राज्यांवर हल्ला केला आणि त्यानंतर सामना मधेच थांबवण्याचा निर्णय घेण्यात.

रणजित गायकवाड

india vs pakistan war ipl 2025 pbks vs dc punjab kings vs delhi capitals match cancelled

धर्मशाला : पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामना रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानने भारतातील तीन राज्यांवर हल्ला केला आणि त्यानंतर सामना मध्यभागी थांबवण्यात आला. पंजाब १०.१ षटकांत १२२ धावांवर खेळत असताना स्टेडियममध्ये अचानक ब्लॅकआऊट करण्यात आला. लाईट टॉवरमध्ये काहीतरी समस्या असल्यासारखे वाटत होते पण यानंतर सामना रद्द झाल्याची घोषणा करून खेळाडूंसह प्रेक्षकांना ताबडतोब मैदानाबाहेर पाठवण्यात आले. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी सामना रद्द झाल्याची पुष्टी केली आहे.

पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. यात उधमपूर, जम्मू, अखनूर, पठाणकोट आणि कठुआ येथे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले जे भारताने पाडले. याशिवाय राजस्थान आणि पंजाबमधील महत्त्वाच्या शहरांवरही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले. पण भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्यांची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हाणून पाडली. या हल्ल्यांनंतर, खबरदारीचा उपाय म्हणून हा आयपीएल सामना रद्द करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT