भारताच्या विजयाचे हिरो तिलक वर्मा व शिवम दुबे 
स्पोर्ट्स

India-Pakistan Asia Cup final| भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया कपावर नाव कोरले

पाकिस्‍तानचा रडीचा डाव : भारतीय फलंदाज पूरुन उरले

Namdev Gharal

मुंबई : शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्‍या भारत पाकिस्‍तान या हाय होल्‍टेज सामन्यात पुन्हा एकदा भारताने पाकिस्‍तानला धुळ चारली आहे. भारताच्या तिलक वर्माने ६९ धावांची खेळी करत भारताला विजयी तिलक लावला आहे. त्‍याला शिवम दुबे ३३ धावा व संजू सॅमसने २४ धावांची मोलाची साथ दिली. १४७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्‍या टीम इंडियाने पाकिस्‍तानला दुबईच्या मैदानात लोळवण्याचे काम केले. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच दोलायमान स्‍थितीत राहिली.

शेवटच्या दोन ओव्हर राहिल्‍यावर पाकिस्‍तानने रडीचा डाव खेळला. षटक टाकायला वेळ घेत भारतीय फलंदाजांची लय तोडण्याचा प्रयत्‍न केला. पण भारताचे तिलक वर्मा व शिवम दुबे त्‍यांना पुरुन उरले. व शेवटी एशिया चषकावर आपले नाव कोरले. ४१ वर्षानंतर भारत - पाकिस्‍तान या मालिकेत फायनमध्ये आमने - सामने आले होते.

भारताला १८ चेंडूत ३० धावांची गरज आहे

शिवम दुबे - तिलक वर्मा क्रिझवर टिकून असून त्‍यांनी भारताच्या संघाला विजयासमीप आणले आहे तिलक वर्माने ४५ चेंडूत ५४ धावा केल्‍या आहेत तर शिवम दुबेने स्‍फोटक खेळी करत २० धावांवर खेळत आहे. विजयासाठी भारताला १८ चेंडूत ३० धावांची गरज आहे.

तिलक वर्मा टिकून

भारताचा डाव सावरलेल्‍या संजू सॅमसन हा २४ धावांवर बाद झाला असून भारताची अवस्‍था बिकट झाली आहे. सॅमसन नंतर शिवम दुबे खेळण्यास आला आहे. साहिबजादा फरहान ने अबरार अहमदच्या चेंडूवर झेल घेतला. तिलक वर्मा ३५ धावांवर खेळत आहे.

८ व्या षटकात भारताच्या ५० धावा

भारताचे सुरवातीचे दोन फलंदाज स्‍वस्‍ता बाद झाल्‍यानंतर भारताच्या संजू सॅमसन व तिलक वर्मा यांनी भारताचा धावफलक हलता ठेवला आहे. ८ व्या षटकात भारताच्या ५० धावा झाल्‍या असून सॅमसन - ११ तर तिलक वर्मा २० धावांवर खेळत आहे. भारताचे ३ बळी गेले आहेत.

भारताची सुरवात अडखळत १० धावांमध्ये २ विकेट

पाकिस्‍तानला १४६ धावांमध्ये थांबवल्‍यानंतर भारताची सुरवातही चाचपडत झाली आहे. सलामीचे फलंदाज अभिषेक शर्मा व कॅप्टन सुर्यकूमार यादव अतिशय स्‍वस्‍तात बाद झाले. अभिषेक केवळ ५ धावा काढू शकला. तर सुर्यकुमार केवळ १ धावा काढू शकला. शाहिन आफ्रीदीच्या गोलंदाजीवर सलमान आघाकडे त्‍याचा झेल गेला.

अभिषेक शर्मा केवळ ५ धावा करुन आऊट

पाकिस्‍तानच्या पहिल्‍याच षटकात भारताला पहिला झटका बसला आहे. अभिषेक शर्मा केवळ ५ धावा करुन आऊट झाला. फईम अश्रफच्या गोलंदाजीवर हरिष रौफने त्‍याचा झेल टिपला. भारतच्या दुसऱ्या षटकात ८ धावा झाल्‍या आहेत.

पाकिस्‍तानचा डाव १४६ धावांत आटोपला

१८ व्या षटकात जसप्रीत बुमराहने ९ वा बळी घेतल्‍यानंतर शेवटचे फलंदाज एक षटक क्रिझवर टिकले. शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्‍या बुमराहने पहिल्‍याच बॉलवर मोहमद नवाझ याचा रिकूकरवी झेल घेतला. व पाकिस्‍तानचा डाव १४६ धावांत आटोपला.

कुलदीप यादवची कमाल

पाकिस्‍तानच्या मधल्‍या फलंदाजानी हाराकीरी केली असून भारतीय गोलंदाजांनी त्‍यांना चांगलेच जेरीस आणले आहे. १३४ धावांवर गडगडला आहे. ८ वी विकेट पडली असून कुलदपने ४ बळी घेतले आहे १७ व्या षटकात ७ वि विकेट शाहीन आफ्रिदीची एलबीडब्‍लूने घेतल्‍यानंतर दुसऱ्याच चेंडूवर फईम अश्रफ यालाही तिलक वर्माच्या हाती झेलबाद करुन तंबूत पाठवले

पाकिस्‍तानचा डाव गडगडला

६ वा बळी, पाकिस्‍तानचा डाव गडगडला. १६ व्या षटकात कुलदीप यादवने सलमान आघा याचा बळी घेतला. तो आठ धावा करुन तंबूत परतला. १७ व्या षटकापर्यंत पाकिस्‍तान १३३ धावांवर खेळत आहे.

भारतीय गोलदांजानी कमाल दाखवण्यास सुरवात

पाकिस्‍तानचा पाचवा गडी बाद झाला असून, भारतीय गोलदांजानी कमाल दाखवण्यास सुरवात केली आहे. पाचवी विकेट हुसेन तलत याची पडली. विकेटकिपर संजू सॅमसन याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपला.

सेट झालेला फलंदाज फकर जमन बाद

पाकिस्‍तानला वरुण चक्रवर्ती ने सेट झालेला फलंदाज फकर जमनला बाद केले. त्‍याने सलामीला येउन ४६ धावा केल्‍या. तत्‍पर्वी पाकिस्तानला तिसरा धक्का अक्षर पटेलने दिला. त्याने मोहम्मद हरिसला रिंकू सिंगने झेलबाद केले. तो त्याचे खाते उघडू शकला नाही. १५ षटकांनंतर पाकिस्तानने ४ बाद १२८ धावा केल्या आहेत.

मोहमद्द हॅरीस शुन्यावर परतला

१४ व्या षटकात भारताला तिसरे यश मिळाले असून, सॅम अयुबला बाद झाल्‍यानंतर त्‍याच्या जागी आलेला मोहमद् हॅरीसला खातेही खोलता आले नाही. तो अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रिंकू सिंगकरवी झेलबाद झाला

पाकिस्‍तान ११३ धावांवर

कुलदीप यादवने सॅम अयुबला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले आहे. पाकिस्‍ताने १३ षटकांनतर ११३ धावापर्यंत मजल मारली आहे.

पहिल्‍या विकेटसाठी पाकिस्‍तानची ८४ धावांची भागिदारी

वरुण चक्रवर्तीने साहिबजादा फरहानला बाद करून भारताला पहिली यश मिळवून दिले. साहिबजादा आणि फखर जमान यांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करत पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली होती. तथापि, वरुणने साहिबजादाला बाद करून ही भागीदारी मोडली आणि भारताला सुटकेचा नि:श्वास सोडला.

पॉवर प्लेमध्ये भारतीय गोलंदाजाना यश नाही

आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध चांगली सुरुवात केली आहे. पॉवरप्लेमध्ये भारतीय गोलंदाजांना यश मिळवता आले नाही. सहा षटकांनंतर पाकिस्तानने बिनबाद 50 धावा केल्या आहेत.

पाकिस्‍तानची दमदार सुरवात :

या महामुकाबल्‍यात पाकिस्‍तानची सुरवात दमदार झाली आहे. शाहबजादे फरहान २३ रन केले आहेत. फकर जमान हा ६ धावांवर खेळत आहे. चौथ्‍या षटकापर्यंत ३० धावा धावफलकावर लागल्‍या आहेत.

हार्दिक पंड्या सामन्यात नसणार

शिवम दुबे याने भारताचे पहिले षटक टाकले. तर पाकिस्‍तानकडून फरहान व फकर जमान यांनी खेळाला सुरवात केली आहे. पहिल्‍या षटकात चौकार फरहान याने ठोकला

दरम्‍यान भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार सूर्यकुमार यादवने दुखापतीमुळे हार्दिक पंड्या अनुपलब्ध राहणार असल्याचे जाहीर केले. या सामन्यासाठी टीम इंडियाने तीन बदल केले आहेत. हार्दिक पंड्याची जागा रिंकू सिंगने घेतली आहे, अर्शदीप सिंगच्या जागी जसप्रीत बुमराह परतला आहे आणि हर्षित राणाच्या जागी शिवम दुबेचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

भारताने टॉस जिंकला

दोन्ही संघाचे कप्तान सूर्यकुमार यादव व सलमान अली आघा हे मैदानावर येऊन टॉस केला. यामध्ये भारताने टॉस जिकंला असून प्रथम गोलंदाजी स्‍वीकारली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विजेतेपदाचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आता स्टेडियममध्ये पोहोचत आहेत. भारताला पाठिंबा देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

टॉस ७:३० वाजता

आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला दोनदा पराभूत केले आहे आणि आता पाकिस्तानविरुद्ध विजयाची हॅटट्रिक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारत टी-२० आशिया कप विजेतेपद जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे.

भारताविरुद्धच्या आशिया कपच्या अंतिम सामन्यासाठी पाकिस्तानी संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पोहोचला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना थोड्याच वेळात सुरू होईल, टॉस संध्याकाळी ७:३० वाजता होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT