rohini kalam photo
स्पोर्ट्स

India Jiu-Jitsu Player: IPS होण्याचं स्वप्न... भारताला कांस्य पदक जिंकून देणाऱ्या रोहिणीनं उचललं टोकाचं पाऊल

रोहिणीनं जीवन संपवण्याचं कारण नोकरीच्या ठिकाणचं टेन्शन?

Anirudha Sankpal

India Jiu-Jitsu Player Rohini Kalam:

भारतीय क्रीडा विश्वाला हादरवणारी घटना मध्यप्रदेशच्या देवस इथं घडली. रविवारी भारताची आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कळम राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आली. ३५ वर्षाच्या रोहिणीनं एशियन्स गेम्समध्ये जुजित्सू मार्शल आर्ट्स प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तिनं २०२२ थायलंड ओपन ग्रांड प्रिक्स स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते.

पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर रोहिणीनं टोकाचं पाऊल उचलच जीवन संपवल्याचा अंदाज वर्तवला आहे. रोहिणीची धाकटी बहीण रोशनीला राधागंज येथील घरी रोहिणीनं गळफास लावून घेतल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर रोहिणीला रूग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी रोहिणीला मृत घोषित केलं.

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी रोहिणीची आई आणि बहीण या मंदिरात गेल्या होत्या. तर वडील देखील घराबाहेर होते. रोहिणी घरात एकटीच होती. तपासात रोहिणीजवळ एक चिठ्ठी सापडली आहे.

रोहिणीच्या बहिणीनं सांगितलं की, रोहिणी ही अष्टा येथील एका खासगी शाळेत मार्शल आर्टची प्रशिक्षक म्हणून जॉब करत होती. ती शनिवारी घरी आली होती. त्यावेळी ती नोकरीबाबत तणावात होती.

मुख्याध्यापकही द्यायचे त्रास?

रविवारी सकाळी तिनं नेहमीप्रमाणं चहा आणि नाष्टा केला. त्यानंतर ती आपली रूम लॉक करून फोनवर बोलत होती. रोहिणीची बहीण रोशनीला तिची बहीण कोणत्या मानसिक तणावातून जात आहे याची कल्पना होती. ती म्हणाली, 'ती तिच्या नोकरीबाबत चिंतेत होती. शाळेतील स्टाफ तिला त्रास देत होता. तिच्या शाळेतील मुख्याध्यापक त्रास देत होते. ती फोनवर ज्या प्रकारे बोलत होती त्यावरून मला याचा अंदाज येत होता.

IPS अधिकारी व्हायचं होतं

रोहिणी ही आपल्या पाच भावंडांपैकी सर्वात मोठी होती. ती लग्नाचे प्रस्ताव देखील सतत धुडकावत होती. तिला आयपीएस अधिकारी व्हायचं होतं. याचबरोबर तिनं गेली दोन वर्षे विक्रम पुरस्कार मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला होता. कुटुंबियांनी सांगितलं की पाच महिन्यापूर्वीच तिच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ती आजारीच असायची. कुटुंबियांनी रोहिणीनं टोकाचं पाऊल उचलण्यामागं नोकरीबाबतचा ताणच कारण असल्याचं सांगितलं.

रोहिणीची दैदिप्यमान कारकीर्द

रोहिणीने २००७ मध्ये तिच्या क्रीडा प्रवासाला सुरुवात केली आणि २०१५ मध्ये तिने व्यावसायिक जू-जित्सू (Jiu-Jitsu) खेळाडू म्हणून कारकीर्द सुरू केली. तिने हांगझोऊ येथे झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच, बर्मिंगहॅम येथील जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी (World Games) निवड झालेली ती एकमेव भारतीय ॲथलीट ठरली, हा एक दुर्मिळ बहुमान आहे.

पदक तालिका (Medal Tally):

- २०२२ थायलंड ओपन ग्रांड प्रिक्स: तिने ४८ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.

- २०२४ ८ वी आशियाई जु-जित्सू चॅम्पियनशिप (अबु धाबी): तिने 'डुओ क्लासिक' प्रकारात आणखी एक कांस्यपदक पटकावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT