Junior Women's Asia Cup | सुप्रियाची हॅट्‌ट्रिक; भारत अंतिम फेरीत 
स्पोर्ट्स

Junior Women's Asia Cup | सुप्रियाची हॅट्‌ट्रिक; भारत अंतिम फेरीत

दक्षिण कोरियाचा ५-१ गोलने धुव्वा

पुढारी वृत्तसेवा

मोकी-चीन; वृत्तसंस्‍था : ड्रॅग-फ्लिक स्‍पेशालिस्‍ट सुप्रियाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने एएचएफ कनिष्ठ महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. येथील पहिल्या उपांत्य लढतीत गतविजेत्या भारताने दक्षिण कोरियाचा ५-१ असा एकतर्फी पराभव केला. सुप्रियाने तीन पेनल्टी कॉर्नरचे अचूक गोलांत रूपांतर करत शानदार हॅट्‌ट्रिक नोंदवली. आता जेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना यजमान चीन आणि जपान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी होईल.

पहिल्या सत्रात सावध सुरुवात

१३ व्या मिनिटाला मधू सिदारने चेंडू थेट जाळ्यात धाडत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. १७ व्या मिनिटाला सुप्रियाने अचूक ड्रॅग-फ्लिक मारून आघाडी दुप्पट केली तर २१ व्या मिनिटाला सुखवीर कौरने उत्कृष्ट मैदानी गोल करत आघाडी ३-० वर नेली.

मध्यंतरानंतर ३३ व्या मिनिटाला सुप्रियाने कोणतीही चूक न करता वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल नोंदवला. दक्षिण कोरियाचा एकमेव गोल ४१ व्या मिनिटाला युरी जिआँगने केला. अंतिम सत्रात ५६ व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर सुप्रियाने दमदार प्रहार करत आपली हॅट्‌ट्रिक साजरी केली आणि भारताचा ५-१ असा दिमाखदार विजय निश्चित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT