Shubman Gill 
स्पोर्ट्स

IND vs ENG ODI: भारतीय संघाची वन-डे मालिकेत विजयी सलामी

शुभमन गिलचे नेतृत्‍वाला साजेसे अर्धशतक; अक्षरचे अष्‍टपैलू योगदान

पुढारी वृत्तसेवा

बर्मिंगहॅम : कर्णधार शुभमन गिलच्या (८० धावा) शानदार खेळीच्या जोरावर आणि अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर यांच्या नाबाद अर्धशतकांच्या मदतीने भारताने पहिल्या वन- डे सामन्यात इंग्लंडचा ६ गडी राखून पराभव केला.

बर्मिंगहॅम येथे खेळवल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात इंग्‍लंडने ६ बाद १०७ धावांवरून सर्वबाद २५८ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, भारताने ४५.२ षटकांत ४ बाद २६२ धावांसह शानदार विजय मिळवला.

विजयासाठी २५९ धावांचे आव्‍हान असताना भारतीय संघातर्फे कर्णधार शुभमन गिलने ७५ चेंडूंत ८० धावांचे योगदान दिले. याशिवाय, वॉशिंग्‍टन सुंदर (नाबाद ५२) व अक्षर पटेल (नाबाद ५७) यांनीही दमदार अर्धशतके झळकावली. रोहित शर्मा व विराट कोहली स्‍वस्‍तात बाद झाल्‍यानंतरही भारताने येथे शानदार विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारतीय संघ मालिकेत १-० अशा आघाडीवर पोहोचला आहे.

बुमराहचे इंग्लिश भूमीत सर्वाधिक बळी

बुमराह आता इंग्लंडमध्ये भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३१ बळी घेणारा गोलंदाज ठरला. शिवाय, त्‍याने वन-डे क्रिकेटमधील आपल्या १५० बळींचा टप्पाही यशस्वीपणे पूर्ण केला. भारतासाठी सर्वात कमी चेंडू फेकून १५० बळींचा टप्पा गाठणारा तो तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT