8 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर करुण नायरचे टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले असून त्याने इंग्लंडच्या धर्तीवर पहिली परीक्षा उत्तीर्ण केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर इंडिया अ आणि वरिष्ठ संघात निवड झालेल्या करुण नायरने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावून लक्षवेधले आहे. त्याने शानदार फलंदाजी केली आणि चाहत्यांची मने जिंकली. नायरने दाखवून दिले की त्याच्यात अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे.
या सामन्यात टीम इंडियाने कर्णधार इश्वरनची पहिली विकेट गमावली. त्यानंतर करुण मैदानात उतरला. त्याने यशस्वी जैस्वालच्या साथीने संघाचे अर्धशतक धावफलकावर झळकावले. 51 धावांवर जैस्वाल बाद झाला. अशाप्रकारे टीम इंडियाने 2 विकेट लवकर गमावल्या. त्यानंतर करुणने डाव हाताळला आणि नंतर त्याचे फटके खेळले. त्याने 85 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, ज्यामध्ये 9 चौकारांचा समावेश होता. त्याने सर्फराज खान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 150+ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे भारत सुरुवातीच्या अपयशातून सावरला. इंडिया अ संघाने चहापानापर्यंत 55 षटकांच्या अखेरीस दोन विकेट गमावून 227 धावा केल्या. यावेळी करुण 91 आणि सर्फराज 92 धावांवर खेळत होते. चहापानानंतर खेळ सुरू झाल्यावर पहिल्याच षटकात सर्फराज खान 92 धावांवर बाद झाला. त्यानंतर करुण नायरने 155 चेंडूत शतक पूर्ण केले.
करुणला बऱ्याच काळानंतर भारताकडून खेळण्याची संधी मिळाली आहे आणि त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे. तत्पूर्वी, इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आणि यशस्वी जैस्वाल इंडिया अ संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले. तथापि, इंडिया अ संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाने 12 धावांवर ईश्वरनची विकेट गमावली. जोश हलने ईश्वरनला एलबीडब्ल्यू केले. तो 17 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने आठ धावा काढून तो बाद झाला.
भारत अ संघाकडून यशस्वी चांगल्या लयीत दिसत होता आणि करुण नायरसोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु गोलंदाज एडी जॅकने त्याला माघारी धाडले. जेम्स रयूने जैस्वालचा झेल घेतला. यशस्वीने 55 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 24 धावा काढल्यानंतर तो बाद झाला.
यशस्वी ज्या पद्धतीने बाद झाला त्याबद्दल तो खूप निराश दिसला. तो जवळपास तासाभर क्रिजवर राहिला आणि त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांविरुद्ध आरामात खेळ केला.
भारत अ संघाने दुपारच्या जेवणापर्यंत दोघांचेही बळी गमावले. तथापि, करुणने सर्फराजसह डाव हाताळला. चार दिवसांच्या अनौपचारिक कसोटीच्या पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत भारत अ संघाने दोन विकेटसाठी 86 धावा केल्या होत्या.