स्पोर्ट्स

IND A vs AFG A : अफगाण ‘अ’ संघाला नमवत भारत ‘अ’ अंतिम फेरीत

श्रीलंकेतील तिरंगी मालिका

रणजित गायकवाड

डम्‍बुला : तिलक वर्मा, प्रियांश आर्य आणि कुमार कुशाग्र यांच्या अर्धशतकांनंतर गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने तिरंगी मालिकेत अफगाणिस्तान ‘अ’ चा १०१ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ९ बाद ३१९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात अफगाणचा डाव ३६.५ षटकांत २१८ धावांवर आटोपला. या मोठ्या विजयासह भारताने ४ गुणांसह थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्‍यानंतर सलामीवीर वैभव सूर्यवंशी (३८) आणि प्रियांश आर्य (५८) यांनी अवघ्या ८ षटकांत ७५ धावांची वेगवान भागीदारी करत संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार तिलक वर्मा (५९) आणि कुमार कुशाग्र (५८) यांनी चौथ्या विकेटसाठी १०४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरला. ३२० धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणचा संघ एकदाही विजयाच्‍या ट्रॅकवर दिसून आला नाही. डावखुरा फिरकीपटू निशांत सिंधूने ६.५ षटकांत ३१ धावा देऊन ४ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘अ’: ५० षटकांत ९ बाद ३१९ (तिलक वर्मा ५९, प्रियांश आर्य ५८, कुमार कुशाग्र ५८; अब्दुल्लाह अहमदझाई २/६२) अफगाणिस्तान ‘अ’: ३६.५ षटकांत सर्वबाद २१८ (बहिर शाह ५७, फैसल शिनोझादा ४६; निशांत सिंधू ४/३१, यश ठाकूर २/४८)

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनक्षेत्र साकोलीच्या वन्यप्राणी बचाव दलाला (शिघ्र कृती दल) घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दलाने घटनास्थळाची सखोल पाहणी करून पाईपच्या एका बाजूस पिंजरा बसविला. अत्यंत संयम, कौशल्य आणि नियोजनाचा वापर करत बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. वनविभागाच्या या तत्पर आणि व्यावसायिक कार्यपद्धतीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

यानंतर एनएनटीआरचे पशुधन विकास अधिकारी मेघराज तुलावी यांनी बिबट्याची आरोग्य तपासणी केली. तपासणीत सदर बिबट (नर) पूर्णतः शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT