स्पोर्ट्स

IND vs SL 2nd Test : श्रीलंका पुन्‍हा पराभवाच्या छायेत, फॉलोऑननंतर दुसर्‍या डावात ६ बाद २२९ धावांपर्यंत मजल

चौथ्‍या दिवसअखेर १६ धावांची नाममात्र आघाडी, भारताचा पाचव्या दिवशी विजय निश्चित

रणजित गायकवाड

कोलंबो : पहिल्या डावात मोठी पिछाडी पत्करावी लागल्यानंतर फॉलोऑनचा सामना करणाऱ्या यजमान श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पसिंदू सुरियाबंडाराच्या (९२) झुंजार खेळीच्या जोरावर कडवा प्रतिकार केला. मात्र, दिवसअखेर ६ बाद २२९ धावांपर्यंत मजल मारली, तरी त्‍यांना केवळ १६ धावांची नाममात्र आघाडी घेता आली होती.

पहिल्या कसोटीतील विजयानंतर आता पाचव्या दिवशी श्रीलंकेचे उर्वरित ४ फलंदाज झटपट बाद करून मालिका २-० ने जिंकण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाकडे आहे. या लढतीत गुरुवारी श्रीलंकेचा पहिला डाव २९० धावांवर आटोपला. सोनल दिनुशाने (१०३) दमदार शतक झळकावत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या पहिल्या डावातील ९ बाद ५०३ (घोषित) धावसंख्येच्या जोरावर भारताला २१३ धावांची भक्कम आघाडी मिळाली. भारताकडून गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णा (३/५२) आणि मानव सुथार (३/८५) यांनी प्रत्येकी ३ बळी घेत लंकन फलंदाजीचा कणा मोडला, तर सारांश जैनने (२/६९) दोन महत्त्वपूर्ण बळी टिपले.

यानंतर फॉलोऑन स्वीकारून दुसऱ्या डावासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. मात्र, पसिंदू सुरियाबंडाराने ९२ धावांची संयमी खेळी रचत डाव सावरण्‍याचा पुरेपूर प्रयत्‍न केला. त्याला कामिंदू मेंडिसने ५५ धावांची उपयुक्त साथ दिली. शेवटच्‍या सत्रात मुसळधार पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा सोनल दिनुशा (७) आणि केशरा नुवांथा (३) क्रीझवर नाबाद होते.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ९ बाद ५०३ घोषित. (श्रीलंका पहिला डाव) : ८९.४ षटकांत सर्वबाद २९० (सोनल दिनुशा १०३, पसिंदू सुरियाबंडारा ८०; प्रसिद्ध कृष्णा ३/५२, मानव सुथार ३/८५, सारांश जैन २/६९). श्रीलंका दुसरा डाव (फॉलोऑननंतर) : ७२.४ षटकांत ६ बाद २२९ (पसिंदू सुरियाबंडारा ९२, कामिंदू मेंडिस ५५; सोनल दिनुशा नाबाद ७, केशरा नुवांथा नाबाद ३).

सर्वाधिक वेळा फॉलोऑन लादणारे भारतीय कर्णधार

८ वेळा : विराट कोहली

७ वेळा : मोहम्‍मद अझरुद्दीन

४ वेळा : महेंद्रसिंह धोनी

४ वेळा : सौरभ गांगुली

३ वेळा : शुभमन गिल

३ वेळा : राहुल द्रविड

३ वेळा : सुनील गावसकर

२ वेळा : पॉली उम्रीगर

२ वेळा : कपिल देव

२ वेळा : नरी कॉन्‍ट्रॅक्‍टर

कसोटीत सर्वाधिक वेळा डाव घोषित करणारे कर्णधार (घोषित डाव / कर्णधार)

३४ / विराट कोहली

१५ / सुनील गावसकर

१२ / महेंद्रसिंह धोनी

१२ / सौरभ गांगुली

१२ / मोहम्‍मद अझरुद्दीन

११ / कपिल देव

१० / बिशन सिंग बेदी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT