स्पोर्ट्स

IND vs SA 2nd Test Day 1: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिकेने ६ गडी गमावत केल्‍या २४७ धावा

फिरकीपटू कुलदीप यादवने घेतले तीन बळी

पुढारी वृत्तसेवा

IND vs SA 2nd Test Day 1: ट्रिस्टन स्टब्स आणि टेम्बा बावुमा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ संपला तेव्हा त्यांच्या पहिल्या डावात सहा बाद २४७ धावा केल्या. पहिल्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्‍हा सेनुरन मुथुस्वामी 25 धावांसह आणि काइल व्हेरेनने 1 धावांसह खेळत होते.

कुलदीप यादवने घेतले ३ बळी

भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. दरम्‍यानदक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एडेन मार्कराम आणि रायन रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी 82 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात दिली. बुमराहने पहिल्या सत्राच्या समाप्तीपूर्वी मार्करामला गोलंदाजी करून ही भागीदारी मोडली. त्यानंतर कुलदीपची फिरकी यशस्वी झाली आणि संघाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. आता, दुसऱ्या दिवशी, भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेचा डाव लवकर गुंडाळण्यावर लक्ष केंद्रित करतील.

सिराजने भारताला मिळवून दिली सहावी विकेट

मोहम्मद सिराजने टोनी डी जॉर्जीला बाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. जॉर्जी २८ धावांवर बाद झाला.

कुलदीपने केली मुल्डरची 'शिकार'

68 व्‍या षटकाच्‍या दुसर्‍या चेंडूवर कुलदीप यादवला फटकेबाजी करण्‍याच्‍या प्रयत्‍नात मुल्‍डरने यशस्वी जयस्वालकडे सोपा झेप दिला. त्‍याने १८ चेंडूत १३ धावा केल्‍या. २०१ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा निम्‍मा संघ तंबूत गेला आहे.

कुलदीपने स्टब्सला तंबूत धाडले

६४व्‍या षटकाच्‍या पहिल्‍या चेंडूवर कुलदीप यादवच्‍या फिरकीने ट्रिस्टन स्‍टब्‍सला चकवा दिला. चेंडू स्टब्सच्या अपेक्षेपेक्षा जास्त वर गेला आणि बॅटवरून उंचावरून पहिल्या स्लिपमध्ये राहुलकडे गेला. राहुलने कोणतीही चूक न करता झेल टिपला. १८७ धावांवर दक्षिण आफ्रिकेने चौथी विकेट गमावली आहे. स्‍टब्‍सने ११२ चेंडूंचा सामना करत ४९ धावा केल्‍या. यामध्‍ये ४ चौकार तर २ षटकारांचा समावेश आहे.

बावुमाला जडेजाने बाद केले

भारताला तिसरे यश टेम्बा बावुमाच्या रूपाने मिळाले. जडेजाने त्याला ५८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले. 166 च्या धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्‍का बसला आहे.

दुसरे सत्र संपले, दक्षिण आफ्रिका १५६/२

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेने २ बाद १५६ धावा केल्या आहेत. ट्रिस्टन स्टब्स (३२) आणि टेम्बा बावुमा (३६) फलंदाजी करत आहेत. त्यांनी आधीच ७४ धावांची भागीदारी केली आहे.

द. आफ्रिकेने ओलांडला १५० धावांचा टप्‍पा

दक्षिण आफ्रिकेने १५० धावांचा टप्पा ओलांडला असून, बावुमा-स्टब्स जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे.ट्रिस्टन स्टब्स (२८) आणि टेम्बा बावुमा (३२) फलंदाजी करत आहेत.

33 व्‍या षटकात दक्षिण आफ्रिकेने पूर्ण केला १०० धावांचा टप्‍पा

33 व्‍या षटकात दक्षिण आफ्रिकेने १०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला. ट्रिस्टन स्टब्स आणि टेम्बा बावुमा हे दोघेही आठ धावांवर खेळत आहेत.

रिकेल्टन बाद

२८ व्‍या षटकात दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्‍का बसला. फिरकीपटू कुलदीपच्‍या जाळ्यात रायन रिकेल्‍टन फसला. पंतने अचूक झेल टिपला. रायन याने ८२ चेंडूत ३५ धावांची खेळी केली.

बुमराहने मार्कराम केले क्लीन बोल्ड

दक्षिण आफ्रिकेला ८२ धावांवर पहिला धक्‍का बसला. २७व्‍या ष्‍टकाच्‍या अखेरच्‍या चेंडूत एडेन मार्करामला भारतीय वेगवान गोलंदाज बुमराहने क्‍लीन बोल्‍ड केले. त्‍याने ८१ चेंडूत ३८ धावा केल्‍या.

मार्कराम आणि रिकेल्टनमध्‍ये अर्धशतकी भागीदारी

दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी देखील पूर्ण केली आहे.

एडेन मार्करामला जीवनदान, केएल राहुलने झेल सोडला

सातव्‍या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एडेन मार्करामला जीवनदान मिळाले. स्लिपमध्ये केएल राहुलने झेल घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या हातातून घसरला. 10 षटकांच्‍या खेळानंतर दक्षिण आफ्रिकेने विनाबाद २६ धावा केल्‍या आहेत.

भारतीय संघात दोन बदल

मालिकेतील पहिल्‍या कसोटी सामन्‍यात दुखापत झाल्‍याने शुभमन गिल गुवाहाटी कसोटी खेळणार नाही. ऋषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्त्‍व करत आहे. भारतीय संघात दोन बदल करण्‍यात आले आहेत. कर्णधार शुभमन गिलची जागा नितीश रेड्डीला संधी मिळाली आहे. अक्षर पटेलची जागा साई सुदर्शनने घेतली आहे.दक्षिण आफ्रिकेने कॉर्बिन बॉशची जागी सेनुरन मुथुस्वामीला संधी दिली आहे.

भारतीय संघ : केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका संघ : एडेन मार्कराम, रायन रिकेलटन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्गी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (यष्टिरक्षक), मार्को जानसेन, सेनुरन मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT