स्पोर्ट्स

IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढतीची सुरुवात संगीत सोहळ्याने!

दिनेश चोरगे

अहमदाबाद; वृत्तसंस्था : अवघ्या दोनच दिवसांवर येऊन ठेपलेल्या भारत-पाकिस्तान या 'मदर ऑफ ऑल बॅटल्स' लढतीची सुरुवात संगीत सोहळ्याने होणार आहे. दोन्ही संघ येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवार दि. 14 रोजी परस्परांना भिडणार आहेत. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी या संगीत सोहळ्याला सुरुवात होईल आणि तो 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत चालणार आहे.

छोट्या मुलांचे एक पथक मॅस्कॉटस्च्या रूपात हजर असेल. ते दोन्ही संघांतील खेळाडूंना मैदानापर्यंत एस्कॉर्ट करतील. या लढतीसाठी पाकिस्तानचे 20 ते 25 माध्यम प्रतिनिधी उपस्थित असतील, असे संकेत आहेत. 'पीसीबी'चे काही पदाधिकारीदेखील या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये येणार आहेत.

भारत-पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतात, त्यावेळी त्याला जणू युद्धाची पार्श्वभूमी असते. यंदाची लढतदेखील याला अपवाद नाही. आजवर वन-डे विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांना भिडले, त्यावेळी भारतानेच अधिक सरशी प्राप्त केली आहे. आजवर भारत व पाकिस्तान संघ सातवेळा आमनेसामने आले असून, यात प्रत्येक वेळी भारताने बाजी मारली आहे.

भारताने यंदा ऑस्ट्रेलियाला धूळ चारत जोरदार सुरुवात केली, तर पाकिस्तानने आपले दोन्ही सामने जिंकत या लढतीसाठी आपण सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. या लढतीची अवघ्या क्रिकेट वर्तुळाला प्रतीक्षा असून, या लढतीपूर्वी खास संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर, रजनीकांत व अमिताभ बच्चन या गोल्डन तिकीटधारकांची उपस्थिती ठळक वैशिष्ट्य असेल, असे 'जीसीए' सचिव अनिल पटेल यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT