स्पोर्ट्स

IND vs PAK Playing 11 Prediction | अभिषेकचे पुनरागमन, कुलदीपला संधी मिळणार? भारत-पाकिस्तान सामन्यासाठी असा असेल संभाव्य संघ

IND vs PAK Match Playing 11 Prediction : संजू सॅमसनला अंतिम ११ मधून स्‍थान न मिळण्‍याची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

IND vs PAK Match Playing 11 Prediction:

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ मधील ज्या महामुकाबल्याची क्रिकेट चाहते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते, तो क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार असून, या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा संघात परतण्यासाठी सज्ज असून, त्याच्यासाठी संजू सॅमसनला अंतिम ११ मधून बाहेर जावे लागू शकते.

सूर्यकुमारने दिले अभिषेकच्‍या खेळण्‍याबाबत संकेत

सामन्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक या सामन्यात खेळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. दुसरीकडे, कोलंबोच्या खेळपट्टीचा नूर पाहता गोलंदाजीमध्येही बदल अपेक्षित आहे. अर्शदीप सिंगच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवचा समावेश करण्याबाबत संघ व्यवस्थापनात मोठी चर्चा सुरू आहे. आता कर्णधार सूर्यकुमार नेमकी काय रणनीती आखतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानची रणनीती वेगवान गोलंदाजीवर?

पाकिस्तानच्या ताफ्याचा विचार करता, नसीम शाह हा अनुभवी वेगवान गोलंदाज असून आकाशातील ढगाळ वातावरण पाहता तो प्रभावी ठरू शकतो. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांच्यावर वेगवान माऱ्याची धुरा असेल. फिरकी विभागात उस्मान तारिक, अबरार अहमद या तज्ज्ञांसह शादाब खान आणि सईम अयुब यांची साथ त्यांना मिळणार आहे.

संभाव्य भारत संघ : अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग/कुलदीप यादव.

संभाव्‍य पाकिस्तान संघ : सैम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (यष्टीरक्षक), शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, उस्मान तारिक आणि अबरार अहमद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT