IND vs NZ Mohammed Shami pudhari
स्पोर्ट्स

IND vs NZ Mohammed Shami: अशी कशी संघ निवड? दुखापतग्रस्त पंतला संघात स्थान... विकेट्सचा रतीब घालणारा शमी मात्र नाही संघात

दुखापग्रस्त खेळाडू चालतात शमीची निवड करायला मात्र अडचण आहे.

Anirudha Sankpal

IND vs NZ Mohammed Shami: न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. संघ जाहीर झाला अन् पुन्हा एकदा मोहम्मद शमीला टीम मध्ये जागा नाही हे अधोरेखित झालं आहे. दुसरीकडे दुखापतग्रस्त पंतला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच प्रसिद्ध कृष्णाची निवड देखील त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. त्यामुळं दुखापग्रस्त खेळाडू चालतात शमीची निवड करायला मात्र अडचण आहे अशी धारणा चाहत्यांची झाली आहे.

संघाची घोषणा

भारत आणि न्यूझीलंड विरूद्धच्या पाच टी २० आणि ५ वनडे सामन्यांच्या मालिकेसोबतच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी देखील बीसीसीआयने संघाची घोषणा केली. पहिली कसोटी ही १९ नोव्हेंबर रोजी वेलिंगटनमध्ये सुरू होणार आहे. या कसोटीत जसप्रीत बुमराह हा कसोटी पुनरागमन करणार आहे. आदाश दीप आणि अंशुल कंम्बोज हे बॉलिंग कॉम्बिनेशन असण्याची शक्यता आहे.

मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष

मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी देखील संघाचा भाग आहेत. मात्र डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये विकेट्सचा रतीब घालणाऱ्या मोहम्मद शमीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. रणजी ट्रॉफी २०२६-२७ च्या हंगामात बंगालकडून खेळताना दिल्ली विरूद्धच्या सामन्यात शमीने ५ विकेट्स घेतल्या.

दुखापतग्रस्त पंत अन् प्रसिद्ध

ऋषभ पंत इराणी ट्रॉफीच्या सामन्यात साईड स्ट्रेनच्या समस्येनं बेजार झाला होता. उर्वरित भारताचे नेतृत्व करत असताना पहिल्या डावात स्विप शॉट मारताना त्याला ही दुखापत झाली होती. त्यानंतर तो न्यूझीलंड अ विरूद्धच्या सामन्यातून तो बाहेर झाला होता. मात्र तरी देखील निवड समितीने त्याला संघात स्थान दिलं आहे.

दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णा देखील कसोटी संघात आला असूनत त्याच्या देखील फिटनेसबाबत साशंकता आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आहे. प्रसिद्ध कृष्णाचे मसल टीयर झालेले नाहीत ही दिलासादायक बाब आहे. तो गेल्या दोन आठवड्यापासून फिटनेस परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पंत आणि प्रसिद्ध या दोघांचीही संघ निवड ही त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे.

१. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

  • शुभमन गिल (कर्णधार)

  • के. एल. राहुल (उपकर्णधार)

  • यशस्वी जायसवाल

  • देवदत्त पडिक्कल

  • ऋषभ पंत (यष्टीरक्षक)*

  • ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)

  • रवींद्र जडेजा

  • अंशुल कंबोज

  • जसप्रीत बुमराह

  • प्रसिद्ध कृष्णा

  • आकाश दीप

  • साई सुदर्शन

  • नितीश कुमार रेड्डी

  • वॉशिंग्टन सुंदर

  • कुलदीप यादव

  • मोहम्मद सिराज

२. पहिल्या तीन एकदिवसीय (ODI) सामन्यांसाठी भारतीय संघ

  • शुभमन गिल (कर्णधार)

  • श्रेयस अय्यर (उपकर्णधार)

  • रोहित शर्मा

  • विराट कोहली

  • के. एल. राहुल (यष्टीरक्षक)

  • नितीश कुमार रेड्डी

  • अक्षर पटेल

  • नमन धीर

  • अंशुल कंबोज

  • गुरनूर ब्रार

  • ऋतुराज गायकवाड

  • अर्शदीप सिंग

  • ईशान किशन (यष्टीरक्षक)

  • मोहम्मद सिराज

  • प्रसिद्ध कृष्णा*

  • कुलदीप यादव

३. चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय (ODI) सामन्यासाठी भारतीय संघ

  • श्रेयस अय्यर (कर्णधार)

  • ईशान किशन (यष्टीरक्षक/उपकर्णधार)

  • रोहित शर्मा

  • विराट कोहली

  • टिळक वर्मा

  • नितीश कुमार रेड्डी

  • अक्षर पटेल

  • नमन धीर

  • आकिब नबी

  • गुरनूर ब्रार

  • ऋतुराज गायकवाड

  • अर्शदीप सिंग

  • कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक)

  • मोहम्मद सिराज

  • यश ठाकूर

  • कुलदीप यादव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT