IND vs IRE Pudhari
स्पोर्ट्स

IND vs IRE: आयर्लंडकडून भारताचा लाजिरवाणा पराभव; 'या' 5 खेळाडूंनी टीम इंडियाची लाज काढली, एका खेळाडूला तर...

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला इतिहासातील पहिला पराभव पत्करावा लागला.

पुढारी वृत्तसेवा

IND vs IRE: टी-20 विश्वचषक 2026 विजेत्या भारतीय संघाला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-20 सामन्यात मोठा धक्का बसला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयर्लंडने भारताचा पराभव केला. कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, लॉर्कन टकरच्या 50 आणि गेरेथ डेलानीच्या 49 धावांच्या जोरावर आयर्लंडने 20 षटकांत 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 18.5 षटकांत 148 धावांत संपुष्टात आला. या पराभवासाठी 5 खेळाडू जबाबदार आहेत.

प्रसिद्ध कृष्णा

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा दिवस अत्यंत निराशाजनक ठरला. त्याने चार षटकांत तब्बल 57 धावा दिल्या आणि एकही विकेट मिळवू शकला नाही. त्याच्या एका षटकात तब्बल 27 धावा करण्यात आल्या. त्याच्या महागड्या गोलंदाजीमुळे आयर्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले.

श्रेयस अय्यर

कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा हा पहिलाच सामना होता. मात्र, नेतृत्व आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर तो प्रभाव पाडू शकला नाही. गोलंदाजांचा वापर करताना काही निर्णय महागात पडले, तर फलंदाजीत तो केवळ 3 धावा करून बाद झाला. संघाला गरज असताना कर्णधाराकडून अपेक्षित खेळी झाली नाही.

तिलक वर्मा

उपकर्णधार तिलक वर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याने 21 चेंडूत 19 धावा केल्या. दबावात असताना चुकीचा फटका खेळून तो बाद झाला. त्याची संथ खेळीही भारताच्या धावगतीवर परिणाम करणारी ठरली.

वॉशिंग्टन सुंदर

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत अपयशी ठरला. गोलंदाजीत त्याने एका षटकात 19 धावा दिल्या, तर फलंदाजीत 12 चेंडूत केवळ 9 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीनंतर पुढील सामन्यात त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईशान किशन

ईशान किशन चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही मोठी खेळी करू शकला नाही. संजू सॅमसन लवकर बाद झाल्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र, घाईत चुकीचा फटका खेळून त्याने विकेट गमावली. तो बाद झाल्यानंतर भारतीय संघावरील दबाव वाढला आणि सामना पूर्णपणे आयर्लंडच्या बाजूने झुकला.

भारतासाठी धोक्याची घंटा

या पराभवामुळे भारतीय संघासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. गोलंदाजीतील सातत्याचा अभाव, मधल्या फळीचे अपयश आणि कर्णधाराची कामगिरी यामुळे संघ व्यवस्थापनाला पुढील सामन्यापूर्वी संघरचनेत बदल करण्याचा विचार करावा लागू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT