स्पोर्ट्स

रवींद्र जडेजा तिसर्‍या कसोटीलाही मुकणार?

Arun Patil

बंगळूर, वृत्तसंस्था : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धक्क्यांमागून धक्के बसताना दिसत आहेत. हैदराबाद कसोटीनंतर रवींद्र जडेजा व के. एल. राहुल यांना दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार जडेजाला हॅमस्ट्रिंग दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी 4 ते 8 आठवडे पुरेसे असतात. परंतु, रवींद्र जडेजा याला त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीतही खेळण्याची शक्यता मावळली आहे.

रांची येथे 23 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत ही कसोटी होणार आहे. के. एल. राहुल मात्र तिसर्‍या कसोटीत खेळण्याची दाट शक्यता आहे.
मोहम्मद शमीही दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. मोहम्मद शमीच्या दुखापतीचे अपडेटस् पाहता, तो या संपूर्ण मालिकेलाच मुकणार आहे. शमी सध्या लंडनमध्ये आहे आणि त्याच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करण्याची सध्यातरी आवश्यकता नसल्याचे वृत्त हाती आहे; पण घोट्याच्या दुखापतीवर त्याचे उपचार सुरू आहेत आणि तो ही संपूर्ण कसोटी मालिका खेळू शकत नाही. सध्याच्या घडीला तो इंडियन प्रीमिअर लीगमधून पुनरागमन करण्याचा अंदाज आहे.

SCROLL FOR NEXT