पुढारी ऑनलाईन डेस्क
भारत- बांगला देश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा आज शनिवारचा (दि.२८ सप्टेंबर) दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला. कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवसातील खेळ शुक्रवारी दोन तासातच संपला होता. काल खेळ थांबला तेव्हा बांगला देशची अवस्था ३ बाद १०७ चावा, अशी होती. आज शनिवारी दुसऱ्या दिवशीचा (IND vs BAN 2nd Test Day 2) खेळ एक चेंडूही न टाकता गेला वाया.
दुसऱ्या दिवशीचा खेळ एक चेंडू न टाकता वाया गेला. संपूर्ण मैदान आज दिवसभर कव्हर्सनी झाकले गेले होते. आज मागील काही तास पाऊस पडला नाही. पण मैदानातील कव्हर्सवर भरपूर पाणी होते. त्यामुळे आजचा दुसरा दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने X वर पोस्ट करत दिली आहे.
पाऊस थांबला आहे. पण अद्याप मैदान प्लास्टिकच्या कव्हर्सनी झाकलेले आहे. लंचब्रेकपर्यंत खेळाला सुरुवात झालेली नाही. यामुळे दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र वाया गेले आहे. संघ हॉटेलवर परतले आहेत.
कानपूरमध्ये आज सकाळी ९ आणि १० वाजता मेघगर्जनेसह ५१ टक्के पावसाच्या शक्यतेचा अंदाज होता. पण त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून ढगाळ हवामान राहील आणि पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.