आज (शुक्रवार) भारत आणि बांगलादेश यांच्यात चेपॉक येथे सुरू असलेल्या कसोटीचा दुसरा दिवस आहे. 
स्पोर्ट्स

IND vs BAN 1st Test Day 2 : दुसऱ्या डावातही रोहित-विराटने केली निराशा, भारताने घेतली 308 धावांची आघाडी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क | IND vs BAN 1st Test Day 2 : बांगलादेश विरुद्धच्या चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला. त्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. त्यांचा पहिल्या डावात केवळ 149 धावांत गारद झाला. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाने 227 धावांची आघाडी घेतली. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4, सिराज-जडेजा आणि आकाश दीपने 2-2 विकेट घेतल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 32 धावा केल्या.

दुसऱ्या डावातही भारतीय कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 5 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल खराब शॉट खेळून बाद झाला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाकडे गेला. यशस्वीने 17 चेंडूत 10 धावा केल्या. विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण 20 व्या षटकात तो LBW झाला. कोहलीने 37 चेंडूत 17 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. शुभमन गिल (33) आणि ऋषभ पंत (12) क्रीजवर आहेत. भारताने 308 धावांची आघाडी घेतली आहे.

बांगलादेशच्या फलंदाजांची शरणागती

बांगलादेशच्या पहिल्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही, जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात शादमान इस्लामला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आकाशदीपने एकाच षटकात झाकीर हसन आणि मोमिनुल हक यांना क्लिन बोल्ड केले. लंच ब्रेकनंतर मोहम्मद सिराजने शांतोला बाद माघारी धाडून बांगलादेशला चौथा धक्का दिला. यानंतर जसप्रीत बुमराहने मुशफिकुरला आपला शिकार बनवले. रवींद्र जडेजाने लिटन दास आणि शकिब अल हसन या दोन सेट फलंदाजांना पॅव्हेलिनमध्ये पाठवून बांगलादेशचे कंबरडे मोडले. चहापानाच्या विश्रांतीपूर्वी बुमराहने हसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर तिसऱ्या सत्रात बुमराहने तस्किनला क्लीन बोल्ड केले. सिराजने नाहिद राणाला क्लीन बोल्ड करून बांगलादेशचा पहिला डाव संपुष्टात आणला. भारताने आपल्या दुस-या डावाला सुरुवात केली आहे.

यशस्वी जैस्वाल बाद

नाहिद राणाने यशस्वी जैस्वालला बाद करून भारताला दुसरा धक्का दिला. रोहित शर्मापाठोपाठ जैस्वाल फार काळ टिकू शकला नाही. त्याने 17 चेंडूंत 10 धावा केल्या. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस मैदानात उतरला.

भारताची आघाडी 250 धावांच्या पुढे

बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाची आघाडी 250 धावांच्या पुढे गेली आहे. रोहित बाद झाल्यानंतर यशस्वी आणि शुबमन गिलने भारताची आघाडी 250 धावांच्या पुढे नेली.

कर्णधार रोहित शर्मा बाद

भारतीय कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या डावातही छाप पाडता आली नाही. तो पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने त्याला बाद करून भारताला 15 धावांवर पहिला धक्का दिला. पहिल्या डावातही रोहितला चांगली फलंदाजी करता आली नव्हती आणि तो सहा धावा करून बाद झाला होता. रोहित बाद झाल्यानंतर शुभमन गिल क्रीझवर आला.

बांगलादेशला फॉलोऑनचा धोका; 7 बाद 92

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने सात गडी गमावले आहेत. त्यामुळे त्यांना फॉलोऑनचा धोका निर्माण झाला आहे. लिटन दासनंतर रवींद्र जडेजाने शकीब अल हसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. लिटनने 22 आणि शाकिबने 32 धावा केल्या. या दोघांमध्ये 51 धावांची भागीदारी झाली. बांगलादेशचा डाव 126 धावांर्यंत संपुष्टात आला, तर भारताकडे फॉलोऑन खेळण्याचा पर्याय असेल.

बांगलादेशला सहावा धक्का; लिटन दास बाद

बांगलादेशला 91 धावांवर सहावा धक्का बसला. रवींद्र जडेजाने शाकिब अल हसन आणि लिटन दास यांच्यातील भागीदारी तोडली. त्याने लिटनला बदली क्षेत्ररक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. लिटन आणि शकीब यांनी सहाव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. लिटनने 42 चेंडूत 22 धावांची खेळी खेळली.

बांगला देशचा निम्मा संघ तंबूत

सामन्याच्या 16 व्या षटकात मुशफिकुर रहिमच्या रूपात बांगला देशला पाचवा फलंदाज बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने के एल राहूल करवी झेलबाद केले रहिमने आपल्या खेळीत 14 बॉलमध्ये 8 धावांची खेळी केली

बांगला देशला चौथा धक्का; शांतो बाद

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगला देशची सुरूवात खराब झाली आहे. त्यांनी अवघ्या 22 धावांवर आपले तीन फलंदाज गमावले. लंच ब्रेकनंतर शांतोच्या रूपात त्यांना चौथा फलंदाज बाद झाला. त्याला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने विराटकरवी झेलबाद केले. शांतोने आपल्या खेळीत 30 चेंडूत 20 धावांची खेळी केली.

लंच ब्रेकपर्यंत बांगला देश 3 बाद 26

दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत बांगलादेशने पहिल्या डावात नऊ षटकांत तीन गडी गमावून 26 धावा केल्या. भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपल्यानंतर बांगलादेशची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात शदमान इस्लामला क्लीन बोल्ड करून धक्का दिला. यानंतर, आकाश दीपने डावाच्या नवव्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर झाकीर हसन आणि मोमिनुल हक यांना बाद केले. नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आकाशने झाकीरला आणि दुसऱ्या चेंडूवर मोमिनुलला क्लीन बोल्ड केले. झाकीरने तीन धावा केल्या, तर मोमिनुलला खातेही उघडता आले नाही. सध्या कर्णधार नझमुल हुसेन शांतो १५ धावा आणि मुशफिकुर रहीम चार धावांसह खेळत आहेत.

याआधी भारतीय संघाचा पहिला डाव 376 धावांवर संपला. आज म्हणजेच शुक्रवारी टीम इंडियाने सहा विकेट्सवर 339 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 37 धावांमध्ये उर्वरित चार विकेट गमावल्या. भारताला दुसऱ्या दिवशी पहिला धक्का रवींद्र जडेजाच्या रूपाने बसला. त्याला तस्किन अहमदने यष्टिरक्षक लिटन दासच्या हाती झेलबाद केले. जडेजाने 86 धावा केल्या. त्याने अश्विनसोबत सातव्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी केली. यानंतर तस्किनने आकाश दीपला बाद केले.

आकाशने 17 धावा केल्या आणि आठव्या विकेटसाठी अश्विनसोबत 24 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तस्किनने अश्विनला शांतोकरवी झेलबाद केले. त्याने 113 धावा केल्या. त्याचे हे कसोटीतील सहावे शतक ठरले. सात धावा करून बुमराह हसन महमूदचा बळी ठरला. हसनने गुरुवारी चार विकेट घेतल्या होत्या आणि बुमराहच्या विकेटसह त्याने पाच बळींचा टप्पा पूर्ण केला. त्याने सलग दोन कसोटीत दोन पाच बळी घेतले आहेत. भारताविरुद्धच्या कसोटीत पाच बळी घेणारा तो बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला आहे. याशिवाय तस्किनने तीन बळी घेतले. नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

याआधी गुरुवारी भारताची टॉप ऑर्डर कोलमडली होती. रोहित शर्मा सहा धावा करून बाद झाला, विराट कोहली सहा धावा करून बाद झाला. शुभमन गिलला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर यशस्वी जैस्वालने ऋषभ पंतसोबत चौथ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. पंत ३९ धावा करून बाद झाला. तर यशस्वीने ५६ धावांची खेळी केली. केएल राहुल पुन्हा फ्लॉप झाला आणि त्याला 16 धावा करता आल्या.

आकाश दीपचा बांगला देशला डबल झटका

आकाश दीपने लागोपाठ दोन चेंडूत दोन विकेट घेत चेपॉकमध्ये कहर केला. त्याने डावाच्या नवव्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर झाकीर हसन आणि मोमिनुल हक यांना क्लीन बोल्ड केले. झाकीरने तीन धावा केल्या आणि मोमिनुलला खातेही उघडता आले नाही.

बांगला देशला बुमराहचा झटका; शादमान इस्लाम तंबूत

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या बांगला देशला बुमराहने झटका दिला. डावाच्या पहिल्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने शादमान इस्लामला क्लीन बोल्ड केले. त्याला आपल्या खेळीत दोन धावा करता आल्या.

भारतीय संघ 376 धावांवर सर्वबाद  

भारतीय संघाचा पहिला डाव 376 धावांवर संपला. आज टीम इंडियाने सहा बाद 339 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 37 धावांमध्ये उर्वरित चार विकेट गमावल्या. भारताला दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्याला तस्किन अहमदने यष्टिरक्षक लिटन दासच्या हाती झेलबाद केले. जडेजाने आपल्या खेळीत 86 धावा केल्या. त्याने अश्विनसोबत सातव्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी केली. यानंतर तस्किनने आकाश दीपला बाद केले. आकाशने 17 धावा केल्या आणि आठव्या विकेटसाठी अश्विनसोबत 24 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तस्किनने अश्विनला शांतोकरवी झेलबाद केले. त्याने 113 धावा केल्या. त्याचे हे कसोटीतील सहावे शतक ठरले. सात धावा करून बुमराह हसन महमूदचा बळी ठरला. हसनने गुरुवारी चार विकेट घेतल्या होत्या आणि बुमराहच्या विकेटसह त्याने पाच बळींचा टप्पा पूर्ण केला. त्याने सलग दोन कसोटीत दोन पाच बळी घेतले आहेत. भारताविरुद्धच्या कसोटीत पाच बळी घेणारा तो बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला आहे. याशिवाय तस्किनने तीन बळी घेतले. नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

याआधी गुरुवारी भारताची टॉप ऑर्डर कोलमडली होती. रोहित शर्मा सहा धावा करून बाद झाला, विराट कोहली सहा धावा करून बाद झाला. शुभमन गिलला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर यशस्वी जैस्वालने ऋषभ पंतसोबत चौथ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. पंत ३९ धावा करून बाद झाला. तर यशस्वीने ५६ धावांची खेळी केली. केएल राहुल पुन्हा फ्लॉप झाला आणि त्याला 16 धावा करता आल्या.

भारताचा डाव 376 धावांवर गुंडाळला

भारतीय संघाचा पहिला डाव 376 धावांवर संपला. आज टीम इंडियाने सहा विकेट्सवर 339 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली होती. आज झालेल्या एक तासाच्या खेळामध्ये भारताने 37 धावांमध्ये चार विकेट गमावल्या.

भारताला नववा धक्का; अश्विन बाद

भारताला 374 धावांवर नववा धक्का बसला. रविचंद्रन अश्विन 133 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 113 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने अनेक मोठे विक्रम केले आणि मोडले. चेपॉकवरील त्याची ही ऐतिहासिक खेळी होती. अश्विन आणि जडेजाने भारताची धुरा सांभाळली, संघाने एकेकाळी 144 धावांमध्ये सहा विकेट गमावल्या आणि 199 धावांची भागीदारी केली. अश्विनने कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. आज दुसऱ्या दिवशी भारताने तीन विकेट गमावल्या. अश्विनच्या आधी जडेजा आणि आकाश दीपमध्ये बाद झाले होते. तस्किन अहमदने आज तिन्ही विकेट घेतल्या.

भारताला आठवा धक्का; आकाश दीप बाद

भारताला 367 धावांवर आठवा धक्का बसला. रवींद्र जडेजाच्या पाठोपाठ आकाश दीप बाद झाला. आजच्या खेळात दोन फलंदाज बाद झाले आहेत. आकाश दीपला शांतोच्या हाती तस्किनने झेलबाद केले. त्याला 17 धावा करता आल्या. त्याने अश्विनसोबत 24 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी जडेजालाही तस्किनने बाद केले. त्याला 86 धावा करता आल्या. जडेजा आणि अश्विन यांच्यात १९९ धावांची भागीदारी झाली.

भारताला सातवा धक्का; जडेजा बाद

दुसऱ्या दिवशी भारताला 343 धावांवर सातवा धक्का बसला. दिवसाच्या तिसऱ्या षटकात तस्किन अहमदने रवींद्र जडेजाला यष्टिरक्षक लिटन दासकरवी झेलबाद केले. जडेजाने 124 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 86 धावांची खेळी केली. त्याने अश्विनसोबत 199 धावांची भागीदारी केली.

अश्विन-जडेजाची आश्वासक खेळी

आर अश्विनचे शतक आणि त्याने रवींद्र जडेजा (86) सोबत केलेली 195 धावांची नाबाद भागीदारी यांच्या जोरावर भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दमदार खेळ केला. टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर सहा विकेट्सवर 339 धावांपर्यंत मजल मारली आहे.

अश्विनने (102*) आपले शतक 108 चेंडूत पूर्ण केले आणि भारताला सहा विकेट्सवर 144 धावांच्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. त्याने चेन्नईत दुसऱ्यांदा कसोटी शतक झळकावले. त्याने 112 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. त्याच्यासोबत जडेजानेही अप्रतिम खेळी खेळली. 117 चेंडूंचा सामना करताना त्याने अश्विनइतकेच चौकार आणि षटकार मारले. कारकिर्दीतील पाचव्या कसोटी शतकापासून तो केवळ 17 धावा दूर आहे. बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज हसन महमूदने चांगली गोलंदाजी करत चार बळी घेतले. नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नाहिद राणा, हसन महमूद आणि तस्किन अहमद या त्यांच्या तीन वेगवान गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला.

भारताची सुरुवात चांगली झाली नाही. एक धावसंख्येवर रोहित शर्माला (6) डीआरएसद्वारे जीवदान मिळाले पण त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. हसनच्या चेंडूवर दुसऱ्या स्लिपमध्ये नजमुल हसन शांतोकडे झेल देऊन तो माघारी परतला. शुभमन गिल (0) आपले खातेही उघडू शकला नाही. तो आठ चेंडू खेळून यष्टीरक्षक लिटन दासकडे झेलबाद झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT