IND vs AUS Live : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जात आहे.  file photo
स्पोर्ट्स

IND vs AUS, 3rd Test Live : भारतासाठी 'पावसाची फिल्डींग', तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

भारताचा पहिला डाव ५१/४

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जात आहे. सोमवारी भारताच्या पहिल्या डावाची सुरूवात अत्यंत खराब झाली. भारताने अवघ्या 51 धावांत ४ विकेट गमावल्या. यानंतर पाऊस धावून आला आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियाचा डाव 445 धावांवर संपला. टीम इंडिया अजूनही 394 धावांनी मागे आहे, त्यामुळे चौथ्या दिवशी फॉलोऑन टाळण्याचे आव्हान भारतासमोर असेल.

भारताला चौथा धक्का, पावसामुळे खेळ थांबला

भारताला 44 धावांवर चौथा धक्का बसला. 2021 मध्ये गब्बा येथे ऐतिहासिक विजयाचे नेतृत्व करणारा ऋषभ पंत नऊ धावा करून बाद झाला.

पावसामुळे सामना तिसऱ्यांदा थांबला

पावसामुळे आज तिसऱ्यांदा सामना थांबवावा लागला. तिसऱ्यांदा सामना थांबवण्यापूर्वी भारताने पहिल्या डावात तीन गडी गमावून 27 धावा केल्या होत्या. सध्या केएल राहुल 14 धावांवर तर ऋषभ पंत चार धावांवर नाबाद आहे.

दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू

दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे. भारत तीन गडी राखून २२ धावांनी आघाडीवर आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंत क्रीजवर आहेत. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

विराट कोहली जोश हेझलवूडचा ठरला बळी

22 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. अवघ्या तीन धावा करून विराट कोहली जोश हेझलवूडचा बळी ठरला. भारताची धावसंख्या तीन गडी गमावून २२ धावा आहे.

भारताला दुसरा धक्का

सहा धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाला. आता भारताने तिसऱ्याच षटकात शुभमन गिलची विकेट गमावली आहे. स्टार्कने दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शुभमनला एक धाव करता आली, तर यशस्वीने चार धावा केल्या. सध्या विराट कोहली आणि केएल राहुल क्रीजवर आहेत.

भारताला पहिला धक्का

भारताला पहिला धक्का चारच्या स्कोअरवर बसला. स्टार्कने पुन्हा एकदा यशस्वी जैस्वालला बाद केले. भारतीय डावातील पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्टार्कने मिचेल मार्शकडे यशस्वीचा झेल घेतला. त्याला चार धावा करता आल्या. यशस्वीने स्टार्कच्या चेंडूवर चौकार मारून सुरुवात केली, पण पुढच्याच चेंडूवर स्टार्कने त्याला बाद केले. सध्या केएल राहुल आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जात आहे. भारतीचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या. आज (दि. १६) ऑस्ट्रेलियाने सात विकेट्सवर 405 धावांवरून खेळाला सुरुवात केली आणि 40 धावा करताना शेवटच्या तीन विकेट्स गमावल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT