दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच गडी गमावून 164 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या आहेत. या बाबतीत भारत अजूनही 310 धावांनी मागे आहे. दुसरा दिवस पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. तिन्ही सत्रात कांगारूंनी भारतीय संघावर वर्चस्व राखले. शेवटच्या सत्रात भारताने फलंदाजी केली तेव्हा एकवेळची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 153 धावा होती. यानंतर टीम इंडियाने सहा धावा करताना आणखी तीन विकेट गमावल्या. यशस्वी जैस्वालचा धावबाद हा टर्निंग पॉइंट ठरला. यशस्वीने कोहलीसोबत 102 धावांची भागीदारी केली. मात्र, यशस्वी धावबाद होताच भारताचा डाव गडगडला. त्याला 82 धावा करता आल्या. यानंतर विराट कोहली 36 धावा करून बाद झाला. त्यानंतर नाईट वॉचमन आकाश दीपही खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. तत्पूर्वी, सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा तीन धावा करून बाद झाला तर केएल राहुल 24 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
पहिल्या अर्ध्या तासात ऑस्ट्रेलियाने एकही विकेट गमावली नाही. स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यांनी 40+ धावांची भागीदारी केली आहे. ऑस्ट्रेलियाने सहा गडी गमावून 344 धावा केल्या आहेत. सध्या स्मिथ 79 आणि कमिन्स 26 धावांसह खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियाने सहा गडी गमावून 371 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ त्याच्या 34व्या कसोटी शतकापासून चार धावा दूर आहे. त्याचबरोबर कमिन्सने त्याला चांगली साथ दिली आहे. तो 36 धावा करून क्रीजवर आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 72 धावांची भागीदारी झाली आहे.
गाब्बा नंतर स्टीव्ह स्मिथनेही मेलबर्न कसोटीत शतक झळकावले आहे. त्याने 167 चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावले. स्मिथने आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. भारताविरुद्धच्या कसोटीतील हे त्याचे 11वे शतक होते आणि टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा तो फलंदाजही ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने सहा गडी गमावून 379 धावा केल्या आहेत. त्याच्यासोबत पॅट कमिन्स 37 धावा करून खेळत आहे. दोघांमध्ये 80 धावांची भागीदारी झाली आहे.
ऑस्ट्रेलियाला 411 धावांवर सातवा धक्का बसला. रवींद्र जडेजाने पॅट कमिन्सला नितीश रेड्डीकरवी झेलबाद केले. त्याचे अर्धशतक हुकले. तो 63 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 49 धावा करून बाद झाला. कमिन्सने स्मिथसोबत सातव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. सध्या मिचेल स्टार्क आणि शतकवीर स्मिथ क्रीजवर आहेत.
दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सात गडी गमावून 454 धावा केल्या आहेत. आज ऑस्ट्रेलियाने सहा गडी गमावून 311 धावांनी पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 5.30 च्या धावगतीने 27 षटकांत 143 धावा केल्या. या काळात संघाला एकच धक्का बसला. पॅट कमिन्स 49 धावा करून जडेजाचा बळी ठरला. भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या दिवशी विकेट्सची आस लागली आहे. कमिन्सने स्मिथसोबत सातव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. सध्या स्टीव्ह स्मिथ 139 धावांवर आणि मिचेल स्टार्क 15 धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये 43 धावांची भागीदारी झाली आहे.
ऑस्ट्रेलियाला 455 धावांवर आठवा धक्का बसला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रातील पहिल्याच षटकात कांगारूंना धक्का बसला. जडेजाने मिचेल स्टार्कला क्लीन बोल्ड केले. त्याला 15 धावा करता आल्या. स्टार्कने स्टीव्ह स्मिथसोबत आठव्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. सध्या स्मिथ 140 धावा करून क्रीजवर आहे. त्याला साथ देण्यासाठी नॅथन लिऑन आला आहे. जडेजाने तीन विकेट घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाला 455 धावांवर नववा धक्का बसला. आकाश दीपने स्टीव्ह स्मिथला बोल्ड केले. स्मिथ विचित्र पद्धतीने बाद झाला. स्मिथने पुढे सरकत आकाशचा शॉर्ट पिच चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅटला लागून पॅडला लागला आणि नंतर विकेटवर आदळला. स्मिथ दोन फूट पुढे गेला होता आणि चेंडू रोखण्यासाठी मागे गेला नाही. यानंतर चेंडू आणि स्टंपला लागला. त्याने 197 चेंडूत 13 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 140 धावा केल्या. सध्या स्कॉट बोलँड आणि नॅथन लियॉन क्रीजवर आहेत.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 धावांवर संपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यानंतर स्टीव्ह स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावले. कर्णधार पॅट कमिन्सने 49 धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 बाद 311 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. मात्र, चार विकेट्ससाठी भारतीय गोलंदाजांना आज कसरत करावी लागली. ऑस्ट्रेलियाने आज 163 धावा केल्या आणि चार विकेट गमावल्या. स्मिथ 140 धावा करून बाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. आकाश दीपने दोन, तर सुंदरने एक विकेट घेतली. भारताकडून सलामीला कोण येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीला येण्याची शक्यता आहे.
कांगारुंना 10 धक्का नेथन लायनच्या रुपात बसला. त्याला बुमराहने एलबीडब्लू बाद केले. लायनने या डावामध्ये 18 चेंडूत 13 धावा केल्या, या दरम्यान त्याने एक चौकार मारला. त्याने स्कॉट बोलंड सोबत 15 धावांची भागिदारी केली.
कांगारुंनी बनवलेल्या 474 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय सलामीवीर मैदानामध्ये उतरले आहे. यावेळी सलामीसाठी केएल राहुलच्या जागी कर्णधार रोहित शर्मा आला आहे. राहुल तीन नंबरवर खेळणार आहे.
भारताच्या डावाच्या सुरुवातीलाच दुसऱ्या षटकां आठच्या स्कोअरवर पहिला धक्का बसला. रोहित शर्माही सलामीवीर म्हणून खेळण्यास आला होता. पण इंथही तो अपयशी ठरला. या सामन्यासाठी त्याने यशस्वीसोबत सलामी दिली. मात्र, दुसऱ्याच षटकात पॅट कमिन्सच्या चेंडूवर तो बोलंडकरवी झेलबाद झाला. रोहितला तीन धावा करता आल्या. रोहितच्या सलामीमुळे शुभमन गिलला संघातून वगळण्यात आले. मात्र, हिटमॅन पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. सध्या केएल राहुल आणि यशस्वी क्रीजवर आहेत. राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
दुसऱ्या दिवशीच्या तिसरा सत्राचा खेळ सध्या सुरू आहे. यशस्वीला आणि विराट कोहली यांनी भारताने 2 विकेट गमावल्यावर चांगलाच डाव सावरला आहे. सध्या भारतीय संघाची धावसंख्या 100 धावांच्या उंबरठ्यावर आहे.
यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 9 अर्धशतक 80 चेंडूत पूर्ण केले. आतापर्यंत त्याने विराट कोहलीसोबत 50 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. 29 षटकांनंतर भारताची धावसंख्या 104 धावा. कोहली 20 धावा करून क्रीजवर आहे.
दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारताने पहिल्या डावात दोन गडी गमावून 51 धावा केल्या आहेत. केएल राहुलला पॅट कमिन्सने क्लीन बोल्ड केले. त्याला 24 धावा करता आल्या. राहुलच्या विकेटनंतर चहाची वेळ झाली. याआधी कमिन्सने कर्णधार रोहित शर्मालाही (12) पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. या बाबतीत टीम इंडिया अजूनही 423 धावांनी मागे आहे. यशस्वी जैस्वाल 23 धावा करून नाबाद आहे. राहुल आणि यशस्वी यांच्यात 43 धावांची भागीदारी झाली. दुसऱ्या सत्रात 24.4 षटकात 71 धावा झाल्या आणि पाच विकेट पडल्या. यातील दोन विकेट भारताच्या तर तीन विकेट ऑस्ट्रेलियाच्या होत्या.
भारताने 2 बाद 124 धावा केल्या आहेत. विराट कोहली 27 आणि यशस्वी जैस्वाल 62 धावांसह खेळत आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत 73 धावांची भागीदारी झाली आहे. भारताला दुसरा धक्का 51 धावांवर बसला. केएल राहुल 24 धावा करून बाद झाला. तर रोहितला 3 धावा करता आल्या. दोघांनाही कमिन्सने बाद केले.
भारताला 153 धावांवर तिसरा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल 82 धावा करून धावबाद झाला. यशस्वीने डावाच्या 41व्या षटकातील शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळला. चेंडू मिडऑनला गेला आणि यशस्वी धावण्यासाठी धावला. कॉल त्याचाच होता आणि कोहलीही थोडा पुढे आला आणि मागे वळला. कोहलीसोबत यशस्वीही नॉन स्ट्राइक एंडला होता. दोघेही एकाच टोकाला उपस्थित होते आणि कॅरीने चेंडू स्टंपवर मारला. अशातच यशस्वी धावबाद झाला. तो 118 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 82 धावा करून बाद झाला.
ऑस्ट्रेलियाने दोन षटकांत दोन विकेट्स घेतल्या आहेत. यशस्वी धावबाद झाल्यानंतर कांगारूंनी विराट कोहलीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बोलंडने कोहलीला यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद केले. त्याला 86 चेंडूत 36 धावा करता आल्या. सध्या ऋषभ पंत आणि नाईट वॉचमन आकाश डीप क्रीजवर आहेत. एके काळी भारताची धावसंख्या दोन बाद 153 होती, जी आता 4 विकेट्सवर १५४ अशी झाली आहे.
मेलबर्न टेस्टमधील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघ सहा विकेट्सवर 311 धावांनी आघाडीवर आहे. भारताकडून आजचे पहिले षटक मोहम्मद सिराजने टाकले. कमिन्सनेही सिराजच्या चेंडूवर चौकार मारला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या षटकातून नऊ धावा आल्या. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सहा विकेट्सवर 320 धावा आहे.
भारताला 159 धावांवर पाचवा धक्का बसला. भारताने सहा धावा करताना तीन विकेट गमावल्या आहेत. आकाश दीपला लियॉनच्या हातून बोलंडने झेलबाद केले. तो नाईट वॉचमन म्हणून आला होता. आकाशला खाते उघडता आले नाही. सध्या रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत क्रीजवर आहेत. तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल 82 धावा करून बाद झाला तर विराट कोहली 36 धावा करून बाद झाला. रोहित तीन तर राहुल 24 धावा करून बाद झाला.