पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यास आज ऑस्ट्रेलियातील पर्थच्या मैदानावर प्रारंभ झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक मार्यासमोर भारताचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर आटोपला.
पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि फिरकीपटू नॅथन लियॉन या वेगवान गोलंदाजांनी शुक्रवारी इतिहास रचला. कारण त्यांनी एकत्र खेळून 500 कसोटी बळी घेण्याचा नवा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारे ते कसोटी इतिहासातील पहिले समकालीन गोलंदाज ठरले आहे. एकत्र खेळताना कमिन्सने 130, हेझलवूड आणि स्टार्कने 124 आणि लियॉनने 22 विकेट्स घेत एकत्रपणे ५०० बळी पूर्ण केले आहेत. इंग्लंडचे जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स आणि मोईन अली यांनी कसोटीत एकत्र खेळताना ४१५ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त स्टोक्स हा एकमेव सक्रिय खेळाडू आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांपेक्षा ऑस्ट्रेलियाचे हे समकालीन खेळाडू खूपच आघाडीवर आहेत.
ऑस्ट्रेलियाचे कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज, कंसात विकेट : शेन वॉर्न (708 ), ग्लेन मॅकग्रा (563), ब्रेट ली (310 ) आणि जेसन गिलेस्पी (259).