IND vs AFG 1st Test pudhari
स्पोर्ट्स

IND vs AFG 1st Test: दिवसात २ शतके २ अर्धशतके... टीम इंडियानं अफगाणिस्तानची पहिल्याच दिवशी केली हवा टाईट

Anirudha Sankpal

India Vs Afghanistan 1st Test Day 1Live Update: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने कूच केली आहे. सलामीवीर केएल राहुलने शतकी खेळी केली तर साई सुदर्शनने देखील ८१ धावांचे योगदान दिले. त्यानंतर संघाचा कर्णधार शुभमन गिलने देखील अफगाणिस्तानला शतकी तडाखा देत भारताला ३५० च्या पार पोहचवलं. आपल्या खराब फॉर्ममुळं उपकर्णधारपद गमवावं लागलेल्या पंतने देखील अर्धशतकी खेळी केली. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी भारताने ८५ षटकात ३ बाद ३६८ धावा केल्या होत्या. शुभमन गिल १०३ धावा करून तर पंत ५० धावा करून नाबाद राहिले.

IND 368 /3 (85) दिवसअखेर भारताचे वर्चस्व 

अफगाणिस्तानविरूद्धच्या एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतानं खेळ थांबला त्यावेळी ३ बाद ३६८ धावा केल्या होत्या. त्यात कर्णधार शुभमन गिल १०३ तर ऋषभ पंत ५० धावा करून नाबाद होता.

IND 358 /3 (83)शुभमन गिलचे शतक 

केएल राहुल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलने देखील अफगाणिस्तानला शतकी तडाखा दिला. त्याने १३८ चेंडूत शतक ठोकून भारताला ३५० धावांचा टप्पा गाठून दिला. ऋषभ पंत देखील आपल्या अर्धशतकाच्या उंरठ्यावर आहे.

IND 278 /3 (64.2) शुभन गिलचे अर्धशतक

केएल राहुल शतक करून बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली असून त्याने अर्धशतक ठोकत भारताला ३०० धावांच्या जवळ पोहचवलं आहे.

केएल राहुलच्या शतकाचा आनंदावर पडलं विरजन... भारताला तिसरा धक्का

IND 230 /2 (55) राहुल शकताच्या उंबरठ्यावर 

साई सुदर्शन ८१ धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी भारताचा डाव पुढे नेला. राहुल ८८ धावा करून नाबाद आहे तर गिल ३४ धावांवर खेळत आहे.

IND 163 /1 राहुल-साईची मोठी भागिदारी 

केएल राहुल आणि सुदर्शन यांनी नाबाद ११२ धावांची भागीदारी रचत भारताला ३८ षटकात १६३ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. राहुल ६५ तर साई सुदर्शन ७२ धावांवर नाबाद आहेत.

IND 96 /1 (25) भारत शतकाच्या उंबरठ्यावर

यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि साई सुदर्शन यांनी धावांची गती वाढवत २५ षटकात ९६ धावांपर्यंत मजल मारून दिली. साई ३२ तर राहुल ३७ धावांवर खेळत आहे.

IND 41 /1 (13.1)भारताला पहिला धक्का 

भारताचा चांगली सुरूवात करून देण्याच्या प्रयत्नात असलेला यशस्वी जैस्वाल २४ धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या या खेळीत ५ चौकार मारले. मात्र सलीम सफीने त्याची शिकार केली.

IND 15 /0 (4.2) भारताची सावध सुरूवात 

भारताने सावध सुरूवात केली आहे. यशस्वी जैस्वालने १६ चेंडूत ११ धावा केल्या आहेत तर केएल राहुलने एक बाजू लावून धरत ११ चेंडूत ४ धावांचे योगदान दिलं आहे.

नाणेफेकीचा कौल कोणी जिंकला 

शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लेईंग ११ मध्ये मानव सुथारला खेळण्याची संधी मिळाली आहे. तो आपले कसोटी पदार्पण करणार आहे.

खेळपट्टी कशी असेल? 

या मैदानावरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होत आहे. काही आयपीएल प्ले ऑफ सामना इथं झाले आहेत. खेळपट्टीबाबत बोलायचं झालं तर खेळपट्टी ही हिरवी आहे. जसजसा सामना पुढे सरकेल तसतसे खेळपट्टी अजूनच कोरडी होत जाईल. ऊन पाहता सामन्यात दोन ते तीन दिवसांनी फिरकीपटूंना साथ मिळू शकते. चंदीगडचे तापमान हे साधारणपणे ३० ते ४० डिग्री सेल्सियस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

कशी असेल भारताची संभाव्य प्लेईंग ११ 

केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार) , ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, हर्ष दुबे/मानव सुतार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT