IND A vs NZ A pudhari
स्पोर्ट्स

IND A vs NZ A: न्यूझीलंडसमोर टीम इंडियाच्या धुरंधरांनी टाकली नांगी... निम्मा संघ भोपळाही फोडू शकला नाही

भारतीय अ संघ आजपासून न्यूझीलंड अ संघासोबत कसोटी सामना खेळत आहे.

Anirudha Sankpal

IND A vs NZ A: भारताचा दुसरा टी २० सामना आज खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय अ संघ आजपासून न्यूझीलंड अ संघासोबत कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याकडे कसोटी मालिकेची तयारी म्हणून पाहिलं जात आहे. मात्र या सामन्यात पहिल्याच दिवशी भारतासाठी हा न्यूझीलंड दौरा दिसतो तितका सोपा नाही दाखवून दिलं.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा पहिला डाव किवींनी अवघ्या ११३ धावात गुंडाळला. भारताकडून रथी माहारथी या सामन्यात खेळत होते. मात्र त्यांनाही फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. विशेष म्हणजे भारताचा निम्मा संघ हा भोपळाही न फोडता माघारी परतला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने भारताला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. अनुभवी केएल राहुल भोपळाही न फोडता माघारी फिरला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल या डावखुऱ्या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र १७ धावा करून यशस्वी देखील परतला. यानंतर ठकाविक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत गेले. तग धरून असलेला पडिक्कल देखील ७७ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला.

भारताची अवस्था ५ बाद ५६ अशी झाली असताना यश राठोडने डाव सावरण्याचा प्रयत्न करत नाबाद ४४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच भारताला शतकी मजल मारता आली. मात्र दुसरीकडून त्याला म्हणावी तशी चांगली साथ मिळाली नाही. न्यूझीलंडच्या सिमॉन कीनने भारताचा निम्मा संघ गारद केला. तर झॅक गिबसनने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावाची दमदार सुरूवात केली. शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी न्यूझीलडच्या पहिल्या डावात १९ षटकात बिनबाद ५७ धावा झाल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT