Bangladesh ICC Controversy
ढाका : २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारत दौऱ्यावर जाण्याबाबत बांगलादेशने व्यक्त केलेली सुरक्षेची भीती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC)फेटाळून लावली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) असे कोणतेही पत्र लिहून सुरक्षेबाबत दुजोरा दिला नसल्याचे आयसीसीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नझरुल यांनी आज (१२ जानेवारी) माध्यमांशी बोलताना दावा केला होता की,"आयसीसीच्या सुरक्षा पथकाने आमच्या पत्राला उत्तर दिले असून, भारतात बांगलादेशच्या चाहत्यांना सुरक्षेचा धोका असल्याचे त्यांनी मान्य केले आहे," नझरुल यांच्या दाव्यानुसार, आयसीसीने पत्रात तीन मुख्य धोके वर्तवले आहेत होते यामध्ये, मुस्तफिजुर रहमानचा समावेश असल्यास धोका वाढेल, बांगलादेशच्या चाहत्यांनी राष्ट्रीय जर्सी घालून फिरल्यास त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, बांगलादेशातील आगामी निवडणुकांमुळे सुरक्षेची स्थिती अधिक गंभीर होईल.
नझरुल यांचा हा 'भारतविरोधी प्रचार' फोल ठरला आहे. आयसीसीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारचे कोणतेही पत्र बांगलादेशला पाठवण्यात आलेले नाही. या प्रकरणावर आयसीसी लवकरच अधिकृत स्पष्टीकरण जारी करणार असल्याचे समजते.
आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुस्तफिजुर रहमानला दिलेल्या अकाली मुक्ततेमुळे (release) भारत आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेश पुरुष संघाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपली भूमिका आयसीसीला आधीच कळवली आहे.