शुभमन गिल  File Photo
स्पोर्ट्स

शुभमन गिल बनला वनडेतील नंबर 1 फलंदाज! बाबर आझमला टाकले मागे

ICC Ranking : रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांनी जबरदस्त प्रगती केली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी करणारा शुभमन गिल आता जगातील नंबर-1 एकदिवसीय फलंदाज बनला आहे. त्याने पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आझमला मागे टाकले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली सहाव्या स्थानावर आणि श्रेयस अय्यर नवव्या स्थानावर कायम आहे.

गिलने दुसऱ्यांदा वनडेत अव्वल स्थान गाठले

गिलने वनडे फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. बाबर आझम बराच काळ अव्वल स्थानावर होता, पण आता गिलने त्याची राजवट संपुष्टात आणली आहे. गिलला नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या शानदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. गिलचे रेटिंग 796 तर बाबरचे रेटिंग 773 आहे.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत गिलने 3 डावात 86.33 च्या सरासरीने 259 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकली. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 112 धावा होता. रोहितच्या बॅटमधून 3 सामन्यांमध्ये 40.66 च्या सरासरीने 122 धावा आल्या. तर श्रेयस अय्यरने 3 डावात 60.33 च्या सरासरीने 181 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके फटकावली. कोहलीने 2 सामने खेळले आणि 57 धावा केल्या.

‘या’ फलंदाजांनाही फायदा

दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिक क्लासेनला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला दोन स्थानांनी फायदा झाला आहे. तो सध्या क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा कर्णधार चारिथ अस्लंकाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याच्या त्याला फायदा झाला आहे. तो 8 व्या स्थानावर पोहोचला आहे.

गिलची वनडेतील कामगिरी

गिलने 50 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 50 डावांमध्ये 60.16 च्या सरासरीने 2,587 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 7 शतके आणि 15 अर्धशतके झळकली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 208 आहे. गिलने न्यूझीलंड विरुद्ध त्याच्या वनडे कारकिर्दीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 10 सामन्यांच्या 10 डावात 84.28 च्या सरासरीने 590 धावा आल्या आहेत. यात एका द्विशतकी खेळीचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT