आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ग्रीन सिग्नल, ‘या’ गोलंदाजाच्या बॉलिंग अ‍ॅक्शनला हिरवा कंदील Pudhari File Photo
स्पोर्ट्स

आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ग्रीन सिग्नल, ‘या’ गोलंदाजाच्या बॉलिंग अ‍ॅक्शनला हिरवा कंदील

आयसीसीने रविवारी एका पत्रकाद्वारे केली घोषणा

पुढारी वृत्तसेवा

दुबई; वृत्तसंस्था : ‘आयसीसी’ने दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू प्रिनेलन सुब्रायनची गोलंदाजी शैली निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला असून, यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता गोलंदाजी करू शकेल. आयसीसीने रविवारी एका पत्रकाद्वारे ही घोषणा केली.

यापूर्वी, सुब्रायनची गोलंदाजी शैली संशयास्पद असल्याचा अहवाल 19 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डे सामन्यानंतर देण्यात आला होता. या अहवालानंतर, 26 ऑगस्ट रोजी ब्रिस्बेन येथील एनसीएमध्ये त्याच्या गोलंदाजीची स्वतंत्र तपासणी करण्यात आली. या तपासणीत असे आढळले की, त्याच्या सर्व चेंडूंमधील कोपर वळवण्याचा कोन आयसीसीच्या नियमांनुसार असलेल्या 15 अंशांच्या मर्यादेत होता.

31 वर्षीय सुब्रायनने 2025 मध्ये आतापर्यंत फक्त2 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दोन्ही सामने याच वर्षी पदार्पण केलेले आहेत. सुब्रायनने झिम्बाब्वेत कसोटी आणि ऑस्ट्रेलियात वन डे सामना खेळला. त्याच्या गोलंदाजीवर तेथेच आक्षेप घेण्यात आला होता. या दोन सामन्यांमध्ये सुब्रायनने पाच आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत आणि आता त्याचे लक्ष्य ‘प्रोटियाज’ संघात आपले स्थान निश्चित करणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT