स्पोर्ट्स

Bundesliga final : बायर्न म्युनिचला ‌‘बुंदेस्लिगा‌’चे विजेतेपद, हॅरी केनची शानदार हॅट्ट्रिक

अंतिम सामन्यात कोलोनचा 5-1 फरकाने धुव्वा, 122 गोलांचा हॅरी केनचा नवा ऐतिहासिक विक्रम

पुढारी वृत्तसेवा

म्युनिच : हॅरी केनच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर गोलचा नवा विक्रम रचत बायर्न म्युनिकने अखेर ‌‘बुंदेस्लिगा‌’ करंडकावर आपले नाव कोरले. सध्याच्या हंगामातील केनच्या या चौथ्या हॅट्ट्रिकमुळे त्याच्या एकूण गोलांची संख्या 36 वर पोहोचली आहे. रॉबर्ट लेवांडोस्कीच्या 2020-21 मधील 41 गोलांच्या ऐतिहासिक विक्रमापेक्षा तो अवघ्या 5 गोल दूर राहिला. केनच्या या चमकदार कामगिरीमुळे बायर्न म्युनिकने अखेरच्या फेरीच्या सामन्यात कोलोनचा 5-1 असा धुव्वा उडवला.

या सामन्यात टॉम बिशॉफ आणि निकोलस जॅŠसन यांनीही गोल केले.बायर्नने या हंगामात एकूण 122 गोल नोंदवून एक नवा इतिहास रचला आहे. यापूर्वी 1971-72 च्या हंगामात फ्रान्झ बेकनबॉअर आणि गर्ड म्युलर सारख्या दिग्गजांचा समावेश असलेल्या बायर्न संघाने 101 गोल करण्याचा विक्रम केला होता, तो या संघाने सहज मोडीत केला.

फ्रेंच विंगर मायकेल ओलीस याला शनिवारी ‌‘द बुंडेसलिगा प्लेयर ऑफ द सीजन‌’ (हंगामातील सर्वोत्तम खेळाडू) म्हणून गौरवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT