टी-20 मधील जागतिक क्रमवारीत हार्दिक पंड्या हा नंबर एकचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. Twitter
स्पोर्ट्स

ICC रॅकिंगमध्‍ये हार्दिकची अव्वल स्थानी झेप

टी20 मधील नंबर १ अष्‍टपैलू खेळाडू, हसरंगाला टाकले पिछाडीवर

पुढारी वृत्तसेवा

टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात हार्दिक पंड्याने दमदार गोलंदाजी करत टीम इंडियाच्‍या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आपल्‍या कामगिरीते कोट्यवधी चाहत्‍यांचे मन जिंकणार्‍या हार्दिकला आता आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) मोठी भेट मिळाली आहे. टी-20 मधील जागतिक क्रमवारीत हार्दिक हा नंबर एकचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्‍याने श्रीलंकेच्‍या वणींदू हसरंगा यांच्याकडून क्रमांक-१ ची किताब स्‍वत:कडे घेतला आहे.

T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने T20I क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेतली आहे. यंदाच्‍या T20 विश्वचषक स्‍पर्धेत हार्दिकच्‍या नावावर सर्व सामन्‍यांमध्‍ये मिळून एकूण १४४ धावा होत्‍या. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 150 होता. त्याने संपूर्ण स्पर्धेत ११ विकेट घेतल्‍या आहेत. भारत-दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याने हेनरिक क्लासेनची विकेट घेतली आणि सामना भारताच्या बाजूने गेला. हार्दिकने अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात 2 बळी घेत भारताला हा विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

ICC रॅकिंगमध्‍ये हार्दिक प्रथम स्‍थानी

भारताने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याला ICC कडून एक खास भेट मिळाली आहे. ICC T20I अष्टपैलू रँकिंगमध्ये हार्दिक पांड्याने पहिले स्थान मिळविले आहे. त्याने श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाकडून नंबर-1 चे स्‍थान आपल्‍याकडे घेतले आहे.T20I पुरुषांच्या गोलंदाजी क्रमवारीत, एनरिक नोरखिया हा 7 स्थानांनी झेप घेत दुसरे स्थानावर आला आहे. आदिल रशीद 718 रेटिंग गुणांसह गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, ज्याला T20 विश्वचषक 2024 नंतर टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले, त्याने 12 स्थानांची झेप घेतली. बुमराहने संपूर्ण स्पर्धेत एकूण 15 विकेट घेतल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT