नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने लॉकडाऊनमध्येच आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली. त्याने आपण आता बाप माणूस होणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, हार्दिक पांड्या बाप होणार हे कळाल्यानंतर लगेचच टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही त्याला शुभेच्छा दिल्या.
नववर्ष २०२० चा मुहूर्त साधून टी – २० स्टार हार्दिक पांड्याने मॉडेल नताशा स्टॅनकोविक सोबत एक रोमँटिक साखरपुडा केला होता. त्यानंतर सगळे जग लॉकडाऊनमध्ये असताना हार्दिकने अचानक नताशा गर्भवती असल्याचे जाहीर करुन त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यांने आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन त्याचे आणि गर्भवती नताशाचे फोटो शेअर केले. त्याला 'नताशा आणि माझा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत सुखकर सुरु आहे आणि आता हा आणखी सुखकर होणार आहे. आमच्या दोघांच्या आयुष्यात लवकरच अजून एकाची भर पडणार आहे. आम्ही या आयुष्याच्या नव्या टप्प्याबाबत उत्साही आहोत आणि आम्हीला तुमच्या आशिर्वादाची आणि शुभेच्छाचीं गरज आहे.' असे कॅप्शन दिले.
मोहम्मद शमीच्या बायकोने 'न्यूड' फोटो शेअर केल्याने सगळेच हैराण!
बीसीसीआयकडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस
या गोड बातमीनंतर त्याच्या चाहत्यांबरोबच संघातील सहकाऱ्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 'दोघांचेही अभिनंदन. तुमच्या परिवारातील तिसऱ्या मेंबरला खूप सारे प्रेम आणि आशिर्वाद.' अशी प्रतिक्रिया दिली. याचबरोबर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, संघसहकारी यझुवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि मयांक अग्रवाल यांनीतही हार्दिकचे अभिनंदन केले.