टी-20 विश्वचषकानंतर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पंड्याला भारताचा भावी कर्णधार मानले जात होते.  File Photo
स्पोर्ट्स

Hardik vs Suryakumar : हार्दिक नाराज, कॅप्टन सूर्याच्या पहिल्या टीम हर्डलमधून गायब

सूर्याला कर्णधार केल्यामुळे पंड्या नाराज असल्याची चर्चा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik vs Suryakumar : भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत-श्रीलंका मालिका सुरू होण्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव कर्णधार बनल्यानंतर हार्दिक पंड्या भारतीय संघाच्या टीम हर्डलसाठी गैरहजर राहिला. सूर्याला कर्णधार केल्यामुळे पंड्या चांगलाच नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

अलीकडेच बीसीसीआयच्या निवड समितीचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचे कर्णधार का केले याचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘सूर्यकुमार यादवचा फिटनेस हार्दिक पांड्यापेक्षा चांगला आहे. पंड्या दुखापतीशी सतत झुंजत आहे. शिवाय सूर्याने फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पंड्या हा महत्त्वाचा खेळाडू आहे, पण कर्णधारपदासाठी त्याच्या ऐवजी सूर्यकुमार हा एक चांगला पर्याय होता.’ (Hardik vs Suryakumar)

भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकला आहे. त्या विश्वविजेत्या संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या होता. या स्पर्धेनंतर हिटमॅनने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे सहाजिकच टी-20 संघासाठी नव्या नेतृत्वाचा शोध घ्यावा लागला. या शर्यतीत हार्दिक पंड्याचे नाव आघाडीवर होते. त्याला टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवले जाईल, असे मानले जात होते. मात्र, मुख्य प्रशिक्षपदाची सूत्रे हाती घेताच गौतम गंभीर यांनी टीम इंडियात अनेक मोठे बदल केले. (Hardik vs Suryakumar)

गंभीर यांनी टी-20 संघाच्या कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादवच्या नावाला प्राधान्य दिले. निवड समितीसमोर तसा आग्रह धरला. ज्याला मान्यता मिळाली आणि सूर्याच्या नावावर कर्णधारपदाची मोहोर उमटवली गेली. मात्र या निर्णयामुळे हार्दिक चांगलाच नाराज झाल्याची चर्चा आहे. हाताशी आलेले कर्णधारपद निसटल्याने तो दु:खी असल्याचेही बोलले जात आहे. परिणामी तो भारतीय संघाच्या टीम हर्डलसाठी उपस्थित राहिलाच नाही, असेही समजते आहे. (Hardik vs Suryakumar)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT