FIFA World Cup 2026 | कुरासावचा फडशा, तरीही इतिहास रचला! Karen Warren
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 | कुरासावचा फडशा, तरीही इतिहास रचला!

कुरासाव विश्‍वचषकात गोल करणारा सर्वात छोटा देश!

पुढारी वृत्तसेवा

ह्युस्‍टन; वृत्तसंस्‍था : हॅवेत्‍झने २ तर फेलिक्‍स, निको, मुसियाला, ब्राऊन व डेनिझ यांनी प्रत्‍येकी एकवेळा गोलजाळ्याचा अचूक वेध घेतल्‍यानंतर जर्मनीने फिफा फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेत नवख्‍या कुरासावचा ७-१ असा एकतर्फी फडशा पाडला. मात्र, या निराशाजनक पराभवातही कुवासावने नवा इतिहास रचला. कुवासावच्‍या लिव्‍हानोने २१ व्‍या मिनिटाला गोल केला आणि यासह विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गोल नोंदवणारा कुरासाव हा सर्वात छोटा लहान देश ठरला. गेल्या १० वर्षांच्या अथक परिश्रमांचे हे मोठे यश मानले जात आहे.

स्पर्धेतील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात कुरासावचा एकतर्फी फडशा पाडला असला, तरी पूर्वार्धातील पहिल्‍या टप्‍प्‍यात त्‍यांनी जर्मनीला दिलेली टक्‍कर कौतुकास्‍पद ठरली. एकवेळ तर जर्मनीशी त्‍यांनी १-१ अशी बरोबरीही साधली. मात्र, नंतर पूर्ण खेळात जर्मनीने अनुभवाच्‍या जोरावर कुरासावच्‍या मर्यादा सर्व आघाड्यांवर अधोरेखित केल्‍या.

कुरासावची लोकसंख्या अवघी १ लाख ८५ हजार!

फुटबॉल विश्‍वचषकासाठी पात्रता संपादन करत आता जर्मनीसारख्‍या कसलेल्‍या संघाविरुद्ध जोरदार टक्‍कर देणार्‍या कुरासावची लोकसंख्‍या जेमतेम १ लाख ८५ हजार इतकीच आहे, हे विशेष लक्षवेधी!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT