FIFA World Cup 2026 | फ्रान्‍सच्या विजयात डेम्बेलेची हॅट्‌ट्रिक 
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 | फ्रान्‍सच्या विजयात डेम्बेलेची हॅट्‌ट्रिक

नॉर्वेवर एकतर्फी विजय मिळवत गटात अव्‍वल

पुढारी वृत्तसेवा

बोस्टन; वृत्तसंस्‍था : स्टार फॉरवर्ड ओस्मान डेम्‍बेलेने नोंदवलेल्या ऐतिहासिक, धडाकेबाज हॅट्‌ट्रिकच्या जोरावर फ्रान्सने फिफा विश्वचषक स्पर्धेत नॉर्वेला येथे ४-१ फरकाने नमवत आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले. विशेष म्हणजे, मायदेशात १९९८ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर फ्रान्सने प्रथमच ग्रुप स्टेजमधील आपले तिन्ही सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. हे दोन्ही संघ आधीच बाद फेरीसाठी पात्र ठरल्यामुळे येथे गटातील अव्वल स्थानासाठी चुरस होती.

नॉर्वेने संघात दहा मोठे बदल केल्यामुळे हालांडला संपूर्ण वेळ बेंचवरच बसावे लागले. ३२ व्या मिनिटालाच डेंबेलेने आपली हॅट्‌ट्रिक पूर्ण केली. ही विश्वचषक इतिहासातील दुसरी सर्वात वेगवान हॅट्‌ट्रिक ठरली आहे. डेम्‍बेले पहिला गोल एम्बापेच्या पासवर डाव्या पायाने उत्कृष्ट शॉट मारत केला. त्यानंतर बॉक्सच्या बाहेरून अप्रतिम गोल करत त्याने फ्रान्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली. नॉर्वेच्या थिओ आसगार्डने एक गोल करत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला, पण डेंबेलेने गोलरक्षक एगील सेल्व्हिकला चकवून तिसरा गोल केला आणि आपली हॅट्‌ट्रिक साजरी केली. शेवटच्या क्षणात डेसिरे डौएने गोल करत फ्रान्सच्या ४-१ अशा दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.

१९९४ नंतर प्रथमच पहिल्‍या सत्रात हॅट्‌ट्रिक

इतिहासातील पहिलीवहिली पहिल्या हाफमधील विश्वचषक हॅट्‌ट्रिक यापूर्वी १९९४ मध्ये विश्वचषकात नोंदवली गेली. त्‍यावेळी रशियाने कॅमेरूनवर मिळवलेल्या (६-१) विजयात ओलेग सालेन्कोने हॅट्‌ट्रिक केली होती. त्याने पुढे जाऊन सामन्यात पाच गोल केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT