भारतीय क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड Pudhari Photo
स्पोर्ट्स

Anshuman Gaekwad : माजी भारतीय क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी वयाच्या 71व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी ब्लड कॅन्सरशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर निधन झाले. भारतासाठी दोन विश्वचषक खेळलेले गायकवाड 1997 ते 1999 आणि पुन्हा 2000 मध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी बीसीसीआयने एक कोटी रुपयांची मदतसुद्धा जाहीर केली होती. गायकवाड यांनी 1974 मध्ये भारतासाठी पदार्पण केले, त्यांनी त्याच्या कार्यकिर्दीत 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले. 1975 आणि 1979 च्या वर्ल्ड कपमध्येही तो टीम इंडियाचा भाग होता. आपल्या कारकिर्दीत त्यांनी दोन शतकांसह 1154 धावा केल्या आणि 1983 मध्ये जालंधर येथे पाकिस्तानविरुद्ध 201 धावांची सर्वोच्च धावसंख्या केली.

  • अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले.

  • भारताकडून 15 वनडे आणि 40 कसोटी सामने खेळले होते.

  • अंशुमन गायकवाड हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकही होते.

Anshuman Gaekwad | बीसीसीआयची एक कोटी रुपयांची मदत

अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचार सुरू होते. लंडनमध्ये बराच काळ घालवून गेल्या महिन्यात ते मायदेशी परतले. बीसीसीआयने गायकवाड यांच्या उपचारासाठी एक कोटी रुपये दिले होते. यासोबतच 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाच्या सदस्यांनीही या क्रिकेटपटूला मदत केली. गायकवाड यांनी 22 वर्षांच्या कारकिर्दीत 205 प्रथम श्रेणी सामनेही खेळले आहेत.Anshuman Gaekwad

Anshuman Gaekwad | कोचिंग करिअरही अप्रतिम

त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाने 1998 मध्ये शारजाह येथे झालेल्या त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर शानदार विजय नोंदवला होता. अनिल कुंबळेने दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी डावात 10 विकेट घेतल्या तेव्हाही तो संघाचा प्रशिक्षक होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली 2000 ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपविजेते ठरलेल्या भारतीय संघाचे ते प्रशिक्षक देखील होते.

संदीप पाटील यांनी सर्वप्रथम सांगितले

माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी या वर्षाच्या सुरुवातीला ७१ वर्षीय गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. पाटील यांनी सांगितले की, गायकवाड हे एक वर्षाहून अधिक काळ आपल्या आजाराशी धैर्याने झुंज देत होते आणि त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. गायकवाड यांनी पाटील यांना त्यांच्या आर्थिक आव्हानांबद्दल वैयक्तिकरित्या सांगितले होते, त्यानंतर माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयचे खजिनदार आशिष सेलार यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT