पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि लोकप्रिय क्रिकेटपटू हे एक समीकरणच झाले आहे. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांची चाहत्यांमधील 'क्रेझ'ही क्रिकेट खेळापेक्षाही मोठी आहे. क्रिकेट खेळापेक्षाही खेळाडूंचे वाढलेले महत्त्व यावर काही माजी क्रिकेटपटूंनी टीकाही केली आहे. आयपीएलमध्ये खेळाडूच्या कामगिरीपेक्षा त्याची लोकप्रियतेवर इंग्लंडचाइंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने परखड मत व्यक्त केले आहे.
'क्रिकबझ'शी बोलताना मायकेल वॉन म्हणाला की, " आयपीएलमध्ये खेळताना जर तुमचे नाव रोहित शर्मा नसेल, तर तुम्ही संघातील तुमचे स्थान गमावत आहात. सोमवारी झालेल्या सामन्यालत रोहित शर्माने 12 चेंडूत 13 धावा करत बाद झाला. अशा कामगिरी जर दुसर्या खेळाडूने केली असती तर त्याला संघातून वगळण्यात आले असते.
मला नेहमीच वाटते की, रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होण्यासाठी योग्य असेल तर तो आयपीएलमध्ये मुंबई संघाचा कर्णधार कसा नाही? तो भारतासाठी एक अद्भुत कर्णधार आहे. त्याने उत्तम काम केले आहे. एखादा खेळाडू राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वोत्तम असेल तर फ्रँचायझी संघाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती कसा असू शकत नाही?, असा सवालही यावेळी वॉन यांनी केला.
रोहितला फक्त एक फलंदाज म्हणून पाहत आहोत, कारण तो कर्णधार नाही. आता, मला वाटते की तुम्ही सरासरी आकड्यांपासून दूर जाऊ शकता आणि ते सरासरी आकडे आहेत. तुमचे नाव रोहित शर्मा नसेल, तर कदाचित त्या आकड्यांमुळे तुम्ही संघातील तुमचे स्थान कधीतरी गमावत असाल. जेव्हा तुम्ही संघात केवळ फलंदाज असता तेव्हा धावा करणे अनिवार्य होते. सध्याच्या परिस्थितीबद्दल रोहित आणि व्यवस्थापनामध्ये चर्चा होणे आवश्यक आहे. फ्रँचायझीला त्यांच्या माजी कर्णधाराकडून सर्वोत्तम फायदा मिळवण्याचा मार्ग शोधावा लागेल, रोहितचे आकडे संघासाठी एक खरी समस्या आहे. त्याला ते योग्य करण्याचा प्रयत्न करावा लागेल," असा सल्लाही वॉन याने दिला आहे.
मुंबई इंडियन्स संघाने सोमवारी (दि. ३१ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर)चा पराभव करत यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिला विजय नांदवला. या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. रोहितने १२ चेंडूत केवळ १३ धावा केल्या. यंदाच्या हंगामात रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी अनुक्रमे 0, 8 आणि 13 धावा केल्या आहेत.