न्‍यूयॉर्क : रिसेल तिकिटांचे दर सीट मॅपनुसार असे गगनाला भिडत चालले आहेत. 
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 | विश्वचषक फायनलचा थरार की श्रीमंतांचा खेळ?

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क; वृत्तसंस्‍था : फिफा विश्वचषकाच्या स्पेन-अर्जेंटिना अंतिम सामन्यापूर्वी तिकिटांच्या किमतींनी विक्रमी उच्‍चांक गाठले असून, खिशात लाखो रुपये असतील तरच रिसेल मार्केटमध्‍ये तिकिटे घेण्‍यासाठी प्रयत्‍न केला जाऊ शकतो, असे चित्र शनिवारी सामन्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला होते. अधिकृत फिफा दरांपेक्षा रिसेल मार्केटमध्‍ये तिकिटांसाठी लाखो रुपयांची मागणी होत असून, काही प्रीमियम आसनांसाठी तब्बल ५९.६८ लाख रुपये मोजावे लागले असल्‍याचे चित्र आहे.

न्यू जर्सीतील मेटलाईफ स्टेडियमवर रंगणाऱ्या अंतिम सामन्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्याचा थेट परिणाम तिकिटांच्या रिसेल बाजारावर दिसत आहे. उपलब्ध सीट मॅपनुसार वरच्या गॅलरीतील अनेक तिकिटांचे दरही सुमारे ७ ते १० लाख इतके आहेत, तर मैदानालगतच्या लोअर बाऊलमधील तिकिटे ११ लाख ते ३० लाख रुपये या श्रेणीत दिसतात.

काही अतिप्रीमियम आसनांसाठी ५९.६८ लाख इतकी मागणी नोंदवली गेली आहे. मात्र, हे दर ‘फिफा’चे अधिकृत तिकीट दर नसून, रिसेल मार्केटमध्‍ये ठेवलेल्या मागणीच्या किमती आहेत. अधिकृत फिफा तिकिटांच्या मूळ किमती यापेक्षा लक्षणीय कमी होत्या. अंतिम सामन्याची प्रचंड मागणी, मर्यादित उपलब्धता आणि डायनॅमिक प्राईसिंगमुळे रिसेल बाजारात दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT