FIFA World Cup 2026 Paraguay vs Germany : पेनल्टी शूटआऊटमध्ये पराग्वेचा गोलकीपर ऑरलँडो गिलने जर्मनीच्या दोन पेनल्टी अडवून संघाचे विजेतेपद सुकर केले. Pudhari
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 : फुटबॉल विश्‍वचषकातून बलाढ्य जर्मनी 'आऊट', पराग्वे पेनल्टी शूटआऊटमध्ये दिला 'धोबीपछाड'

पराग्वेच्या गोलकीपर ऑरलँडो गिलच्‍या बचावाने अंतिम क्षणी घडला इतिहास

पुढारी वृत्तसेवा

FIFA World Cup 2026 Paraguay vs Germany : फुटबॉल जगतात आज (दि. ३०) एक मोठा चमत्कार पाहायला मिळाला. बोस्टन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात पराग्वेने चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4−3 असा पराभव करत स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या ऐतिहासिक विजयासह पराग्वेने 'राउंड ऑफ १६' (अंतिम १६) मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.पराग्वेचा फुटबॉल इतिहासातील जर्मनीविरुद्धचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.

निर्धारित वेळेत चुरशीची लढत

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. पहिल्या हाफमध्ये पराग्वेच्या जुलिओ एनसिसो याने एक शानदार हेडर करत आपल्या संघाला 1−0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये जर्मनीने जोरदार पुनरागमन केले. फ्लोरियन विर्ट्जच्या उत्कृष्ट क्रॉसवर काई हैवर्ट्जने सुरेख हेडर करत जर्मनीला 1−1 अशी बरोबरी साधून दिली.

अतिरिक्त वेळेत गोल रद्द आणि गोलकीपरची कमाल

निर्धारित ९० मिनिटांनंतर सामना अतिरिक्त वेळेत (Extra Time) पोहोचला. १२ किमी/तास वेगाने धावणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रचंड थकवा दिसत असतानाच, जर्मनीच्या जोनाथन ताह याने गोल केला होता; मात्र फाऊल झाल्यामुळे पंचांनी हा गोल रद्द केला. १२० मिनिटांचा खेळ संपल्यानंतरही धावसंख्या 1−1 अशीच राहिल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.

ऑरलँडो गिल सामन्याचा खरा हिरो

पेनल्टी शूटआऊटमध्ये पराग्वेचा गोलकीपर ऑरलँडो गिल सामन्याचा खरा हिरो ठरला. त्याने जर्मनीच्या दोन पेनल्टी उत्कृष्टपणे अडवून संघाचे विजेतेपद सुकर केले. त्यानंतर पराग्वेच्या जोसे कनाले याने निर्णायक पेनल्टी गोलमध्ये रूपांतरीत करत पराग्वेच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

चार दशकांहून अधिका काळ पेनल्टी शूटआऊटमध्‍ये जर्मनीचा दबदबा

'पेनल्टी शूटआऊट'नंतर विजय हा जर्मनीने चार दशकांहून अधिक काळ विश्वचषकात एक रेकॉर्ड कायम ठेवला होता. मात्र यंदाच्‍या विश्‍वचषकात हा रेकॉर्ड मोडित निघाला. या पराभवासह चार वेळच्या जागतिक विजेत्या जर्मनीला विश्वचषक इतिहासातील पहिल्यांचा पेनल्‍टी शूटआऊट पराभवाचा धक्का बसला आणि विश्वचषकातील सर्वात प्रदीर्घ काळापासून असलेला एक ऐतिहासिक विक्रम मोडीत निघाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT